Wednesday, October 22, 2025
Happy Diwali

शिर्डीतच पंढरपूर

शिर्डीतच पंढरपूर

परमपूज्य साईनाथ महाराज शिर्डीत प्रकटले व त्यानंतर त्यांना अनेक भक्तगण येऊन मिळू लागले. म्हाळसापती हा पहिला भक्त साईचा. त्यानेच साईना पहिली हाक मारली आवो साई म्हणून! त्यानंतर दासगणू महाराज हे साईचे निकटतम शिष्य होते. दासगणू साईना साक्षात देवास्वरूप मानून दिनरात त्यांची सेवा करीत. अनेकदा त्यांच्या नावाने पूजा अर्चा करीत. संध्याकाळच्या वेळी गळ्यात एकतारी व चिपळ्या हाती घेऊन साईचे मन प्रसन्न होईल असे सुस्वरात कीर्तन करीत. आधी ते पोलीस दलात सरकारी नोकरी करीत पण सर्व बरेवाईट अनुभव घेता घेता साई दरबारात मोठ्या भक्ती भावाने सादर येऊ लागले. त्यांची साईवरील प्रेमळ एकनिष्ठता पाहून साईनी त्यांना सरकारी नोकरी सोडण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी केले व साईदरबारात दिवसरात्र सेवा करू लागले. त्यांनी अनेक कविता, अभंग, गाणी, कवने साईनामाने लिहिली. "भक्तीसारामृत" या ग्रंथात शिर्डी साईविषयी ५२व्या अध्यायात सांगतात।। कृष्ण जन्मले मथुरेत। परी राहण्या आले गोकुळात। तैसीच ही तंतोतंत। गोष्ट आली घडुनिया।। शेलुगाव होय मथुरा। शिर्डीग्राम गोकुळ खरा। त्या ग्रामाच्या उद्धारा। महाराज राहीले ये ठाई।। असे हे प्रेमळ दासगणूभक्त साईना म्हणाले मला पंढरपूरला जावेसे वाटते तर साईबाबांनी त्यांना सांगितले. शिर्डीतच पंढरपूर आहे तू लांब का जातोस. आता डोळे मिट व तुला येथेच विठ्ठल दिसेल तसे दासगणूनी डोळे मिटताच त्यांच्या डोळ्यांसमोर साईबाबांच्या जागी पवित्र तेजस्वी विठ्ठलाची मूर्ती दिसू लागली व ते आनंदाश्रूंनी न्हावून गेले. त्यांनी साईनाथांना नमस्कार केला.

शिर्डी माझे पंढरपूर तेथे आनंदाचा महापूर साईनाथ तेथला महानुपूर भक्तांचा लागे गोड सूर ।।१।। दासगणू साईचा भक्त खरा साई परीक्षा घेई, भक्त हाच खरा साईलाच सर्वानी भजा देव तो खरादत्त विठ्ठल साईतच सामावला खरा ।।२।। दासगणू म्हणे जाऊ पंढरपूर साई म्हणे शिर्डीत भक्तीचा पूर कशाला हवे तुज जावया पंढरपूरदासगणू पडला प्रश्न, अश्रूचा पूर ।।३।। दासगणूने मिटता शिर्डीत डोळे दिसू लागले पंढरपुराचे हसरे डोळे विठ्ठल विठ्ठल रुक्मिणी हळूच डोले साईनाथ महाराज की जय दासगणू बोले ।।४।। आता साई म्हणे डोळ मिट प्रथम भेटेल पुंडलिकाची वीट नंतर इंद्रायणी काठी जा तू धीट सर्व विचार करुन बोल नीट ।। ५।।

विलास खानोलकर

Comments
Add Comment