Monday, June 30, 2025

राऊतांविरोधात साक्ष देणाऱ्या स्वप्ना पाटकरांना जीवे मारण्याची धमकी

राऊतांविरोधात साक्ष देणाऱ्या स्वप्ना पाटकरांना जीवे मारण्याची धमकी

मुंबई : पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी ईडीसमोर जबाब नोंदवलेल्या स्वप्ना पाटकर यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. पाटकर यांनी ईडीला ही माहिती दिली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधातील साक्ष मागे घेण्यासाठी आपल्यावर दबाव आणला जात असल्याचा आरोप पाटकर यांनी केला आहे.


स्वप्ना पाटकर यांनी ईडी आणि मुंबई पोलिसांना एक पत्रही लिहिले असून त्यामध्ये त्यांनी आपल्याला दोन-तीन फोन नंबरवरुन बलात्कार आणि हत्या करण्याची धमकी येत असल्याचे म्हटले आहे. संजय राऊतांविरोधातील जबाब मागे घ्यावा किंवा बदलावा यासाठी आपल्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.


ईडीने त्यांच्या पत्राची दखल घेतली असून त्यांची ही तक्रार वाकोला पोलीस ठाणे आणि मुंबई पोलीस आयुक्त तसेच मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सहआयुक्तांनाही याची एक प्रत पाठवण्यात आली आहे. सध्या मुंबई पोलीस याची चौकशी करत आहेत.

Comments
Add Comment