Sunday, March 23, 2025
Homeकोकणसिंधुदुर्गकणकवलीत राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

कणकवलीत राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

कणकवली (प्रतिनिधी) : गोवा बनावटीची दारू बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी अहमदनगरकडे घेऊन जात असताना राज्य उत्पादन शुल्क विभाग सिंधुदुर्गच्या कणकवली शाखेने कारवाई करून तीनजणांना अटक केली. या कारवाईत दोन वाहनांसह दारूचे ९०० बॉक्स जप्त करण्यात आले. एकूण २३ लाख ८१ हजार ६०० रुपयांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला.

राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक कणकवली यांना खात्रीशीर माहिती मिळाल्यामुळे दोन पंच आणि स्टाफसह वादे येथे गाड्यांची तपासणी केली. पांढऱ्या रंगाची बोलेरो पिकअप क्रमांक MH-२३/W-२२८५ वाहन थांबवून तपासणी केली असता. सदर वाहनामध्ये गोवा राज्यात विक्रीस असलेले एकूण ९०० बॉक्स जप्त करण्यात आले. सदर मिळून आलेले.

१०,२९,६०० पांढऱ्या रंगाची बोलेरो पिकअप क्रमांक MH-२३/w-२१८५ व पायलटिंगसाठी वापरण्यात येणारी हुंडाई कंपनीची वेर्णा कार क्रमांक MH-१२/KJ-८८०४ असा एकूण रु. २३ लाख ८१,६०० रुपयांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला. सदर वाहनचालक रवींद्र दत्तू कापसे, वय २७ वर्ष, रा. मु. पो. हाळगांव, ता. जामखेड, जिल्हा अहमदनगर, देवीदास अंबादास डोके, वय ३२ वर्ष, रा. भूतवडा, ता. जामखेड, जिल्हा अहमदनगर व अजित लालासाहेब उबाळे, वय ३२ वर्षे, रा. बोडी, ता. जामखेड, जिल्हा अहमदनगर यांना या कारवाई दरम्यान ताब्यात घेण्यात आले आहे.

सदरील कारवाई अधीक्षक डॉ. वी. एच. तडवी यांच्या प्रत्यक्ष मागदर्शनाखाली निरीक्षक प्रभात सावंत यांनी केली. सदर कारवाईमध्ये दुय्यम निरीक्षक एस. डी. पाटील, जे. एस. मानेमोड, सहाय्यक दुय्यम निरीक्षक एस. एस. चौधरी, महिला जवान एस. एम. कुबेसकर, वाहनचालक जगन चव्हाण, खान व शहा यांनी मदत केली. पुढील तपास निरीक्षक प्रभात सावंत करीत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -