Monday, October 20, 2025
Happy Diwali

'या' सहा देशी क्रीडा प्रकारांची खेलो इंडिया योजनेत निवड

नवी दिल्ली : भारताच्या अनेक भागात स्थानिक संस्कृती आणि परंपरेनुसार अनेक देशी क्रीडा प्रकार खेळले जातात. “क्रीडाक्षेत्र’ हा राज्याचा विषय असल्याने, देशातील अशा देशी खेळांना प्रोत्साहन देण्याची आणि अशा खेळांच्या विकासासाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याची प्राथमिक जबाबदारी, संबंधित राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची आहे. राज्यांच्या या प्रयत्नांना केंद्र सरकार पाठबळ देते.

केंद्रीय क्रीडा मंत्रालय केंद्रीय क्षेत्रावरील एक योजना (Khelo India scheme) खेलो इंडिया- क्रीडा विकासासाठी राष्ट्रीय कार्यक्रम (खेलो इंडिया योजना) राबवत आहे. या अंतर्गत, एक उपक्रम, “ग्रामीण आणि देशी/ आदिवासी क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन” अशा नावाने राबवला जातो. देशी खेळांना याअंतर्गत प्रोत्साहन दिले जाते. मल्लखांब, कल्लरीपयट्टू, गटका, थांग-था, योगासने आणि सीलबम अशा पारंपरिक देशी खेळांची यासाठी निवड करण्यात आली आहे. या खेळांसाठी पायाभूत सुविधा निर्माण, उपकरण सहाय्य, प्रशिक्षकांची नेमणूक आणि शिष्यवृत्ती यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याशिवाय, मल्लखांब, कल्लरीपयट्टू, गटका, थांग-था आणि योगासने हे खेळ, नुकत्याच हरियाणातील पंचकुला इथे झालेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेतही समाविष्ट करण्यात आले होते.

अशी माहिती, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लिखित उत्तरात दिली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >