मुंबई : हार्बर लाईनवरील गोवंडी रेल्वे स्थानकाजवळ सकाळी ऐन गर्दीच्या वेळी रुळाला तडे गेल्याने वाहतूक ठप्प झाली होती. सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास रुळाची दुरुस्ती करून वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली. मात्र दीड-दोन तास होऊनही पनवेल, वाशीसह सर्वच स्थानकांवर प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. परिणामी हार्बर रेल्वे मार्गावरील प्रवाशांना सलग दुसऱ्या दिवशी मनस्ताप सहन करावा लागला.
नवी मुंबई, पनवेलवरून मोठ्या प्रमाणात नागरिक हार्बल मार्गावरील लोकलने मुंबईला येत असतात. सकाळी ऐन घाईच्या वेळी रूळाला तडा गेल्याने चाकरमानी हैराण झाले होते. लोकलचा खोळंबा झाल्याने अनेक प्रवासी स्थानकातून बाहेर पडत सायन-पनवेल महामार्गावरून मिळेल त्या पर्यायी बस किंवा खासगी वाहनाला पसंती देत आपले ठिकाण गाठताना पाहायला मिळाले.