भुईबावडा घाटात धबधब्यात पाय घसरुन सांगलीच्या तरुणाचा मृत्यू

  167

सिंधुदुर्ग : भुईबावडा घाटात मुख्य धबधब्यात पाय घसरून तरुणाचा दुर्दैवी अंत झाला. ही घटना मंगळवारी संध्याकाळी अंदाजे ६ वाजण्याच्या सुमारास घडली. रोशन यशवंत चव्हाण, वय २८ वर्षे, रा. कापडपेठ, ता. जि. सांगली, असे मृत तरुणाचे नाव आहे.


याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मयत रोहन चव्हाण आपल्या मित्रांसमवेत सांगलीहून वैभववाडी तालुक्यातील वेंगसर येथे त्यातील एका मित्रांच्या नातेवाईकांकडे चालला होता. दरम्यान भुईबावडा घाटातून येत असताना मुख्य धबधब्यात आनंद लुटण्यासाठी मयत रोहन चव्हाण धबधब्यात आंघोळ करण्यासाठी उतरला. यावेळी पाऊस मोठा सुरू होता. पाण्याचा प्रवाह वाढल्याने धबधब्यानजिकच मोरी असल्याने मोरीतून पाय घसरून मयत चव्हाण दरीत कोसळल्याने जागीच दुर्दैवी अंत झाला.

Comments
Add Comment

गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुषखबर;मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कार्यवाहीचे आदेश

मुंबई : मुंबई-गोवा मार्गावरून दरवर्षी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या लाखो गणेशभक्तांची गैरसोयीतून सुटका

अमेरिकेने मत्स्य उत्पादनांवर शुल्क वाढवले, आता पुढे काय? मंत्री नितेश राणे यांनी दिली 'ही' योजना

मुंबई : मत्स्य व बंदरे विकास मंत्री, नितेश राणे यांनी महाराष्ट्राच्या मत्स्यव्यवसाय क्षेत्रासाठी एक सकारात्मक

सरपंच-उपसरपंचांना मानधन दुप्पट करण्याचा निर्णय

ग्रा. पं. सदस्यांची अवघ्या २०० रुपयांवर बोळवण मुंबई : राज्यातील महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या अगोदर

माजी सैनिक रमेश खरमाळे यांना ‘राष्ट्रपती भवन’चे आवतण

पर्यावरण रक्षणासाठी झटणाऱ्या अवलियाच्या कामाची दखल जुन्नर : पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घेतलेले जुन्नरचे

Red Soil Stories चे सुप्रसिद्ध यूट्यूबर शिरीष गवस यांचं निधन, वयाच्या ३३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कोकणातील खाद्यसंस्कृती यूट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणारे सुप्रसिद्ध Red Soil Stories चे युट्युबर

गणेशभक्तांचा रेल्वे प्रवास अधिक सुखकर करा!

खा. नारायण राणे यांनी रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन विशेष गाड्या,अधिकचे कोच जोडण्याची केली मागणी नवी दिल्ली :