हा नियतीचा खेळ! केलेल्या कर्माचे फळ!

मुंबई : कपट कारस्थान करणा-या उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीतून आता सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न होत आहे, अशी जळजळीत टीका मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केली आहे.


केलेल्या कर्माची फळे इथेच भोगायची असतात. नियती तिचे चक्र पूर्ण करत असते. जी गोष्ट तुम्ही लोकांसोबत केले तेच आज तुमच्यावर वेळ आली आहे. अमित ठाकरे मोठ्या आजारपणाशी लढत असताना राज ठाकरे व्यस्त होते. तेव्हा शिवसेनेने मनसेचे ६ नगरसेवक फोडण्याचे पाप केले. आज तेच तुमचे आमदार फुटून होत आहे, असा टोला मनसेने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर लगावला आहे.


https://twitter.com/SandeepDadarMNS/status/1551739274848256000

जे कर्म असते त्याची फळे इथेच भोगायची असतात. ते तुम्ही भोगत आहात. मनसेचे नगरसेवक फोडले तेव्हा सर्जिकल स्ट्राईक म्हणून शिवसेना नेते बोंबलत होते. बाळासाहेबांचे नाव वापरू नये म्हणता जेव्हा स्मारकासाठी जागा मागितली तेव्हा बाळासाहेब ठाकरे सर्वांचे होते आता एकट्याचे कसे झाले? मुळात बाळासाहेब ठाकरे हा विचार आहे. ते महाराष्ट्राचे आणि देशाचे नेते होते. त्यांच्यावर कुणाचा मालकी हक्क नाही. सोयीनुसार अर्थ बदलणार का? असा सवाल देशपांडे यांनी केला आहे.


तसेच 'आपलेच प्रश्न, आपलीच उत्तरं' अशी आजची मुलाखत होती. हाच पालापाचोळा तुमच्यासोबत अडीच वर्ष घट्ट होता. जे कपट कारस्थान तुम्ही इतरांसोबत केले तेच आज तुमच्यासोबत घडत आहे. बेस्ट सीएमचा सर्व्हे केवळ उद्धव ठाकरेंपुरता केला होता का? तुम्ही घरात बसला म्हणून महाराष्ट्राची वाट लागली. त्याचं कौतुक कसलं करता? असा टोलाही संदीप देशपांडे यांनी लगावला आहे.

Comments
Add Comment

खोदलेले चर बुजवण्यात कंत्राटदारांची हातचलाखी

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील अनेक रस्ते आणि पदपथाखालून विविध सेवा सुविधांचे जाळे जात असून यामध्ये तांत्रिक

वांद्रे पश्चिममधील एस. व्ही. रोडवरील त्या तुंबणाऱ्या पावसाच्या पाण्यापासून मिळणार मुक्ती

मुंबई (सचिन धानजी) : वांद्रे पश्चिम येथील एस व्ही रोड आणि के.सी मार्गावर पावसाळ्यात पाणी तुंबण्याच्या वारंवारच्या

ब्रिटिशकालीन १२ वर्षांच्या पुलाचा शेवट; रेल्वे ट्रॅकवरील काम जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई: मुंबईतील ११२ वर्षांचा जुना आणि महत्त्वाचा ब्रिटिशकालीन रस्ता पूल, एलफिन्स्टन पूल पाडण्याच्या कामाचा

मविआच्या दुटप्पी भूमिकेची पोलखोल करण्यासाठी भाजपचे आंदोलन

निवडणुकांच्या तोंडावर फेक नरेटिव्हचा 'मविआ' चा कट उधळून लावा – भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण मुंबई: आगामी

वेध निवडणुकीचा : कलिना आणि वांद्रे पूर्व भाजपसाठी अनुकूल; २० ते २२ नगरसेवक निवडून येतील

उत्तर मध्य भाजप जिल्हाध्यक्ष विरेंद्र म्हात्रे यांनी व्यक्त केला विश्वास सचिन धानजी मुंबई : मुंबई उत्तर मध्य

मुंबईत राजकीय रणकंदन पेटले! विरोधकांच्या ‘सत्याचा मोर्चा’ला भाजपचे 'मूक आंदोलन' करत जशास तसे प्रत्युत्तर

मुंबई: निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आणि मतदार यादीतील मोठ्या गोंधळावर आक्षेप घेत, आज (दि. १) मुंबईत महाविकास