पुण्यातील हवेली तालुक्यात ग्रेनेड केला निकामी, परिसरात खळबळ

पुणे (हिं.स) : पुण्यातील हवेली तालुक्यामध्ये एका स्मशानभूमीजवळ एक ग्रेनेड आढळून आला आहे. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याची माहिती मिळताच पोलिसांनी आणि बॉम्बशोधक पथकाने घटनास्थळी धाव घेऊन हे ग्रेनेड निकामी केला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हवेली तालुक्यातील मांजरी खुर्द येथील एका स्मशानभूमीजवळ हा प्रकार घडला आहे. या परिसरात असलेल्या आण्णासाहेब मगर विद्यालयाच्या उजव्या बाजुला बॉम्ब सदृश वस्तू आढळून आली. या परिसरात राहणाऱ्या अभिमान गायकवाड यांच्या निदर्शनास ही बाब आल्याने त्यांनी तातडीने पोलीस पाटील अंकुश उंद्रे आणि अशोक आव्हाळे यांना सांगितले. यानंतर पोलीस पाटलांनी लोणीकंद पोलीस स्टेशनला याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच मांजरी खुर्द येथे पोलीस पथक आणि बॉम्ब शोधक पथक दाखल झाले. पथकाने पाहणी करून तो ग्रेनेड निकामी केला.


पोलिसांनी असेही सांगितले की, खूप वर्षांपूर्वीचा जुना ग्रेनेड तिथे आढळून आलेला आहे. ७ ते ८ वर्षांपूर्वी त्या ठिकाणी भराव टाकण्यात आला होता. पावसामुळे तो आता वर आलेला दिसत आहे. बॉम्बशोधक पथकाने हा ग्रेनेड निकामी केला आहे. हा ग्रेनेड या भरावामध्ये कुठून आणि कसा आला, याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.

Comments
Add Comment

Nashik Accident : शिर्डीला साई बाबांच दर्शन घेतल अन् घरी परताना रस्त्यामध्येच...चौघे जागेवरच ठार!

नाशिक: नाशिक जिल्ह्यातील आंबेगन शिवाराजवळ राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी सकाळी दोन वाहनांची समोरासमोर भीषण

धाडसाचे अमाप कौतुक! ११ वर्षांच्या भावाने बिबट्याच्या तावडीतून वाचवला बहिणीचा जीव

सांगली : सध्या महाराष्ट्रात बिबट्यांचा सुळसुळाट झाला आहे. अनेकांनी आपले जीव गमावले आहेत. अनेक आई बाबानी आपली

बुलढाण्यात लाडकी बहीण योजेनचा लाभ घेणाऱ्या महिलांना झटका; सरकारची कडक कारवाई

बुलढाणा : राज्यातील गोरगरीब महिलांना आर्थिक पाठबळ मिळाव यासाठी सरकारने लाडकी बहीण योजना लागू केली. या योजनेचा

पुणेकरांचा बोपदेव घाट वाहतुकीसाठी ७ दिवस बंद; वाहतुकीत होणार 'हे' बदल

पुणे : पुण्यातील वाहतुकीत सध्या मोठा बदल करण्यात आला आहे. याच कारण म्हणजे पुण्यातील पुणे - सासवड ला जोडणारा बोपदेव

इम्तियाज जलील यांच्या गाडीवर कार्यकर्त्यांचा हल्ला

काळे झेंडे दाखवत नाराजांचा राडा छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकांसाठी प्रचार अंतिम टप्प्यात आला असून

बदलापूर MIDC : पॅसिफिक केमिकल फॅक्टरीत स्फोटांनंतर अग्नितांडव

बदलापूर : बदलापूर पूर्व महावितरण कार्यालयाजवळ पॅसिफिक ऑरगॅनिक केमिकल कंपनीत एका पाठोपाठ एक असे पाच ते सहा स्फोट