Tuesday, July 1, 2025

बस अपघातात ८ ठार, १८ जखमी

बस अपघातात ८ ठार, १८ जखमी

बाराबंकी : उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे सोमवारी सकाळी एक भीषण दुर्घटना घडली. पूर्वांचल द्रुतगती मार्गावर उभ्या असलेल्या एका डबलडेकर बसला दुसऱ्या बसने जोरदार धडक दिली. या अपघातात ८ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर १८ जण जखमी झाले. हा अपघात इतका भीषण होता की, अर्ध्या डबल डेकर बसचे नुकसान झाले आहे.


लोणीकटरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नरेंद्रपूर मद्राहा गावाजवळ हा अपघात झाला. पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहचले आहेत. बचाव पथक मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहे. जखमींना सीएचसी हैदरगडमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.


एएसपी मनोज पांडे यांनी सांगितले की, डबल डेकर बस बिहारमधील सीतामढीहून दिल्लीला जात होती. पूर्वांचल द्रुतगती मार्गावरील नरेंद्रपूर मद्राहा गावाजवळ बस उभी होती. पहाटे ४.४७ वाजता भरधाव वेगात आलेल्या दुसऱ्या बसने धडक दिली. मृत लोक कुठले रहिवासी आहेत, हे अद्याप कळलेले नाही.

Comments
Add Comment