मुंबई : ‘सत्ता असताना बाळासाहेब नाही आठवले, सत्ता गेली की लगेच बाळासाहेब आठवले’, असे दोन फोटोसह ‘सत्य’ असे ट्विट भाजप आमदार नितेश राणे यांनी करत उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीची खिल्ली उडवली आहे. बाळासाहेबांना यांची केव्हा आठवण येते हे सुद्धा त्यांनी या फोटोमधूनच निदर्शनास आणले आहे.
सत्य! pic.twitter.com/kx0coLtdLs
— nitesh rane (@NiteshNRane) July 25, 2022
एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार आणि खासदार गेल्या काही दिवसांपासून सातत्याने उद्धव ठाकरेंच्या गटातील ‘बडव्यां’वर जोरदार टीका करत आहेत. मात्र या टीकेला आता उद्धव ठाकरे यांनी एका मुलाखतीच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. ही मुलाखत शिवसेना नेते संजय राऊत यांनी घेतली असून या मुलाखतीचा टीझर सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. मात्र हा टीझर पाहून काही नेटकऱ्यांनी उलट या मुलाखतीचीच खिल्ली उडवली आहे.
“तुम्ही म्हणजेच महाराष्ट्र का? घरातल्या भांडणातही तुम्हाला महाराष्ट्राचा अपमान दिसतो का?” असे प्रश्न विचारत काही नेटकरी त्यांना ट्रोल करत आहेत.
"तुम्ही मर्द नाही आहात, तुम्ही विश्वास घातकी आहात" – उध्दव ठाकरे to संजय राऊत 😢 pic.twitter.com/DodhENQn1M
— Jai Mahakal (@SambhajiTake) July 25, 2022
नौटंकी
मुळात संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेणे म्हणजे बॅटींग न येणाऱ्या मुलाला त्याच्या मित्राने गॅलरीत टप्पी टप्पी बॉलिंग टाकण्यासारखे आहे.
1/3@PrakashGade13 @khadaksingh_ pic.twitter.com/WSTjaCibEH— Tukaram Koli (@TukaramKoli10) July 24, 2022
काय ते लवंडे,
काय त्यांचे तर्कहीन प्रश्न,
काय ते मामू ,
काय त्यांची पांचट उत्तरे,
काय त्यांचे हातवारे,
काय ती स्क्रिप्टेड मुलाखत,
समंध कस ओक्के मधी आहे.#सेनेला_अश्वलावी_मुलाखत pic.twitter.com/YfRoARK919— मयुर 🇮🇳🚩 (@Mayur9R) July 25, 2022
सुरत ला गेले असते.. घर सोडून…कॉमेडी शो चि खूप वाट पाहत आहोत 😂🤣 pic.twitter.com/8KLok4B8po
— Rahul (@knowme_rahul) July 25, 2022