डॉ. सर्वेश सुहास सोमण
मागील आठवड्यात निर्देशांकात वाढ पाहावयास मिळाली. तसेच सोने या मौल्यवान धातूमध्ये उच्चांकापासून नफा वसुली पाहावयास मिळाली. कच्च्या तेलामध्ये देखील सोन्याप्रमाणे घसरण झाली. तांत्रिक विश्लेषणानुसार चार्टचा विचार करता अल्पमुदतीसाठी सोन्यामध्ये करेक्शन अर्थात तेजीनंतरची तात्पुरती मंदीला सुरुवात झालेली आहे हे आपण मागील लेखातच सांगितलेले होते. त्यानुसार सोन्यामध्ये हालचाल पाहावयास मिळाली. सध्या अल्प मुदतीच्या चार्टनुसार निर्देशांकाची दिशा तेजीची असून टेक्निकल अॅनालिसीसनुसार तेजीत असणाऱ्या शेअर्समध्ये अल्प मुदतीचा विचार करता स्टॉपलॉसचा वापर करूनच तेजीचा व्यवहार करता येईल. चार्टनुसार आयटीसी, नवकार, टीव्हीएस मोटर्स, कमिन्स इंडिया यासारख्या अनेक शेअर्सची दिशा तेजीची झालेली आहे. मध्यम मुदतीच्या चार्टनुसार या आठवड्यासाठी निर्देशांक सेन्सेक्सची ५४००० आणि निफ्टीची १६१०० ही अत्यंत महत्त्वाची पातळी आहे. जोपर्यंत निर्देशांक या पातळीच्या वर आहे तोपर्यंत निर्देशांकामधील वाढ कायम राहील.
आपण मागील काही लेखात सांगितल्याप्रमाणे पुढील काळात शेअर बाजारात आणखी तेजी आलीच. तरी दीर्घ मुदतीनुसार निर्देशांक पुन्हा एकदा नफा वसुलीच्या पातळी जवळ येत आहेत. त्यामुळे टेक्निकल चार्ट देत असलेले संकेत पाहता शेअर बाजारात पुढील काळात होणारी वाढ कितपत टिकेल हे पाहणे महत्त्वाचे आहे. कमोडीटी मार्केटमध्ये टेक्निकल अॅनालिसीसनुसार कच्चे तेल अजूनही तेजीत असून जोपर्यंत कच्चे तेल ७२०० या पातळीच्या वर आहे तोपर्यंत कच्चे तेलात आणखी वाढ होऊ शकते. पुढील आठवड्यासाठी मध्यम मुदतीच्या चार्टनुसार कच्च्या तेलाची ७२५० ही खरेदीची पातळी असून जोपर्यंत कच्चे तेल ७०५० या पातळीच्या वर आहे, तोपर्यंत कच्च्या तेलातील तेजी कायम राहील. अल्पमुदतीसाठी सोने या मौल्यवान धातूची दिशा मंदीची असून मध्यम मुदतीच्या चार्टनुसार जोपर्यंत सोने ५१००० या पातळीच्या खाली आहे तोपर्यंत सोन्यात मंदी कायम राहील.
शेअर बाजार हा अत्यंत भावनिक असतो. सकारात्मक किंवा नकारात्मक अशा कोणत्याही घटनेवर बाजार नेहमीच लगेच प्रतिक्रिया देत असतो. निर्देशांकात जर मोठ्या प्रमाणात घसरण झाली त्याचा फटका हा नेहमीच अल्प तसेच मध्यम मुदतीसाठी शेअर्सची खरेदी किंवा विक्री करीत असलेल्या गुंतवणूकदारांना बसताना दिसतो.
बऱ्याच वेळी शेअर बाजाराच्या घसरणीत घेतलेला शेअर जर खाली आला, तर बहुतेक गुंतवणूकदार हे अल्प तसेच मध्यम मुदतीसाठी घेतलेल्या शेअर्समध्ये स्टॉपलॉसचा वापर करताना दिसत नाहीत. परिणामी होत असलेले नुकसान हे वाढत जाते आणि घेतलेला शेअर कधी तरी पुन्हा वर जाईल या अपेक्षेन तो शेअर लॉंग टर्म म्हणून जतन करून ठवला जातो. जे गुंतवणूकदार शेअर्स घेतानाच दीर्घ मुदतीसाठी म्हणून एखादा शेअर घेतात त्यावेळी ते टेक्निकल आणि फंडामेंटल या दोन्ही गोष्टींची योग्य सांगड घालून शेअरची निवड करत असतात. त्यासोबत पैशाचे योग्य नियोजन करूनच ते गुंतवणूक करीत असतात.
शेअर बाजारात दीर्घ मुदतीची गुंतवणूक ही नेहमीच फायदेशीर ठरताना दिसते. पण त्यासाठी योग्य ठिकाणी गुंतवणूक होणे आवश्यक असते. आज काही असे शेअर्स आहेत जे दीर्घ मुदतीसाठी आकर्षक किमतीला आलेले आहेत. ज्यामध्ये टाइड वॉटर, टीटीके प्रेस्टीज, फोर्स मोटार, पीजीएचएल, कॅम्स, हडको, ट्रान्सफोर्मर अँड रेक्टीफायर्स इंडिया लिमिटेड हे शेअर्स आकर्षक किमतीला आहेत. याशिवाय पुढील दहा वर्षांचा विचार करता, “असेट मॅनेजमेंट”मधील एक कंपनी जी आज अत्यंत आकर्षक किमतीला मिळत असून फंडामेंटलदृष्ट्या देखील चांगली दिसत आहे. “असेट मॅनेजमेंट” या क्षेत्रात क्रमांक दोनची आणि एचडीएफसीसारख्या मोठ्या ग्रुपचा भाग असलेली कंपनी आहे “एचडीएफसी एएमसी” “एचडीएफसी एएमसी” चे मार्केट कॅपिटल आज जवळपास ४७ हजार करोडचे असून फेस व्हल्यू ५ आहे. ही भारतातील मोठी “असेट मॅनेजमेंट” कंपनी असून यांचे मोठ्या प्रमाणात सेविंग आणि इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट आहेत. यांच्या जवळपास २३ इक्विटी संलग्न स्कीम्स आहेत.
या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व कंपन्या आणि एकूण कस्टमर यांचा विचार करता एकूण कस्टमरपैकी जवळपास २७ टक्के कस्टमर हे एकट्या “एचडीएफसी एएमसी” या एका कंपनीचे आहेत. मागील काही वर्षांत त्यांच्या रिझर्व्हमध्ये देखील चांगली वाढ होताना दिसत आहेत. त्याचप्रमाणे सातत्याने प्रत्येक वर्षी चांगला डिव्हिडंट ही कंपनी देत आहे. टेक्निकल चार्टनुसार या शेअरमध्ये उच्चांकापासून ४२ टक्क्यांची घसरण या कंपनीच्या शेअरमध्ये झालेली आहे. त्यामुळे आज १९०१ रुपये किमतीला असणाऱ्या या शेअरमध्ये पुढील १० वर्षांचा विचार करता चांगला फायदा होणे अपेक्षित आहे. आपण आपल्या लेखमालेत २२३८ रुपये किमतीला असतानाच हा शेअर दीर्घमुदतीसाठी उत्तम सांगितलेला आहे. त्यानंतर या शेअर आणखी खाली आलेला आहे. ज्यांना लांब पल्ल्याची गुंतवणूक करावयाची आहे तेच केवळ या शेअरचा विचार करू शकतात.
samrajyainvestments@gmail.com
मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या एच/पश्चिम विभागातील खारदांडा स्मशानभूमी पुन्हा एकदा बंद ठेवण्याची वेळ आली…
पाच रुपयांचे तिकीट दहा रुपये, सहा रुपयांचे तिकीट बारा रुपये मुंबई (प्रतिनिधी) : तोट्यात चाललेल्या…
एनटीसी गिरण्यांच्या जागेची शोध मोहीम सुरू करण्याचे म्हाडाला आदेश मुंबई (प्रतिनिधी) : गिरणी कामगारांच्या घरांच्या…
ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो लवकरच होणार दाखल मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई शहरात आणि उपनगरात मेट्रोची कामे वेगाने…
पुणे : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयाच्या मुहूर्तांवर मार्केटयार्डात मोठ्या प्रमाणात हापूस आंबा उपलब्ध…
प्रा. नंदकुमार काकिर्डे स्वित्झर्लंडस्थित आय क्यू एअर संस्थेने जागतिक पातळीवरील हवा प्रदूषणाचा व्यापक अहवाल प्रसिद्ध…