Tuesday, October 8, 2024
Homeमहत्वाची बातमीसिंधुदुर्गचा प्रतीक घाडीगावकर एनसीसी राष्ट्रीय शूटिंग स्पर्धेत अव्वल

सिंधुदुर्गचा प्रतीक घाडीगावकर एनसीसी राष्ट्रीय शूटिंग स्पर्धेत अव्वल

सिंधुदुर्ग (हिं.स.) : इंटर डायरेक्ट शूटिंग स्पर्धेत देवगड कॉलेज, एनसीसी युनिटचा लान्स कार्पोरल प्रतीक पांडुरंग घाडीगावकर यांने महाराष्ट्राच्या संघात ५८ महाराष्ट्र बटालियन (ओरस) सिंधुदुर्गचे प्रतिनिधित्व केले. या स्पर्धेत महाराष्ट्र डायरेक्टरने एकूण बारा पदकासह अव्वल स्थान मिळवत ही शूटिंग चॅम्पियनशिप जिंकली आहे. ५८ महाराष्ट्र बटालियन तर्फे कर्नल दीपक दयाल सेना मेडल प्राप्त व सुभेदार मेजर दिनेश गेडाम यांनी त्याचा सत्कार केला.

यावेळी सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील एनसीसी कॅडेट्स, सर्व पीआय स्टाफ व एएनओ कॅप्टन आवटे उपस्थित होते. त्याला ५८ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल दीपक दयाळ, कर्नल लेखराज, सुभेदार मेजर दिनेश गेडाम, सुभेदार देवेंद्र सुभेदार इंद्र केस व सुभेदार जितेंद्र तिवारी यांचे मार्गदर्शन लाभले. बटालियन कडून त्याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून घेऊन त्याला योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले. त्याचबरोबर देवगड कॉलेज प्राध्यापिका एएनओ डॉ सुनेत्रा ढेरे यांचेही मार्गदर्शन लाभले.

प्रतीक घाडीगावकरची प्री नॅशनल चॅम्पियनशिपसाठी निवड झालेली आहे. ही स्पर्धा जर यशस्वी झाला तर तो भारताचे प्रतिनिधित्व करेल आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याची त्याला संधी मिळेल अशी माहिती कंपनी कमांडर एनसीसी असोसिएट ऑफिसर लेफ्टनंट प्रा. डॉ. एम. आर. खोत सिंधुदुर्ग कॉलेज यांनी दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -