Tuesday, July 16, 2024
Homeताज्या घडामोडीराष्ट्रवादीला खिंडार! आजी-माजी आमदार भाजपच्या वाटेवर

राष्ट्रवादीला खिंडार! आजी-माजी आमदार भाजपच्या वाटेवर

नवी दिल्ली : सत्तांतर नाट्यानंतर आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि पुढील विधानसभा- लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन महाराष्ट्रात अनेक काँग्रेस, राष्ट्रवादीचे स्थानिक नेते, आजी-माजी आमदार, पदाधिकारी यांना गळाला लावण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू झाले आहेत. पश्चिम महाराष्ट्रात भाजपच्या या मोहिमेला यशही मिळू लागले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील माढ्याचे आमदार बबन शिंदे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आज दिल्लीत बबन शिंदे आणि मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनी भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी याबाबत मध्यस्थी केली. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे. माढ्यामधून शरद पवार हे खासदार झाले होते, त्यामुळे माढा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसची मजबूत पकड आहे.

दरम्यान, भाजप दबावतंत्र वापरत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. दोन महिन्यांपूर्वी बबन शिंदे यांना ईडीची नोटीस आली होती. हे काही भाजपवरचे प्रेम नाही तर दबावामुळे आमदार भाजपमध्ये जात असल्याचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी म्हटले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -