मुंबई : ‘अब राजा का बेटा राजा नही बनेगा, राजा वही बनेगा जो हकदार होगा’ असे ट्विट मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केले आहे. या ट्विटमध्ये बाळासाहेब ठाकरेंसोबतचा राज ठाकरेंचा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. यामुळे आता मनसेकडून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
बाळासाहेबांचे विचार आता राज ठाकरे पुढे घेऊन जाणार आहेत, बाकी कुणीही नाही, असा दावाच देशपांडेंनी केला आहे.
अब राजा का बेटा राजा नही बनेगा राजा वही बनेगा जो हकदार होगा pic.twitter.com/2QxhYD8OeR
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) July 25, 2022
बाळासाहेबांनी ज्यांना विरोध केला त्यांच्यासोबतच तुम्ही व्यवहार केला. उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांकडून प्रतिज्ञापत्र मागतात यापेक्षा मोठे दुर्दैव नाही. अशी जोरदार टीका देशपांडेंनी केली आहे.
शिवसेनेवर आलेल्या या वेळेचे क्रेडिट उद्धव ठाकरेंना जाते, अशी उपाहासात्मक टीका संदीप देशपांडेंनी केली आहे. केमिकल लोचा कुणाचा झालाय हे स्पष्ट होत आहे.
आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री असताना त्यांनी काय काय काम केले याची आता केंद्र चौकशी करणार आहे. त्यात काही गैर असेल तर चौकशी झाली पाहिजेच, असेही देशपांडे म्हणाले.