Friday, October 4, 2024
Homeदेश'गरीबही स्वप्न पाहू शकतात'

‘गरीबही स्वप्न पाहू शकतात’

नवी दिल्ली : देशाच्या सर्वोच्च पदावर निवडून दिल्याबद्दल धन्यवाद, राष्ट्रपतीपदाची जबाबदारी मोठी असल्याचे सांगत महामहिम द्रौपदी मुर्मू यांनी सर्व देशवासीयांचे आभार मानले.

द्रौपदी मुर्मू यांनी शपथविधीनंतर भाषण केले. मुर्मू भाषणात पुढे म्हणाल्या, ‘२६ जुलै हा कारगिल विजय दिवसही आहे. हा दिवस भारतीय सैन्याच्या शौर्य आणि संयम या दोन्हींचे प्रतीक आहे. आज मी कारगिल विजय दिवसानिमित्त देशाच्या सैन्याला आणि देशातील सर्व नागरिकांना माझ्या शुभेच्छा देते.

‘सबका प्रयास, सबका कर्तव्य’

‘स्वतंत्र भारतात जन्मलेली मी देशाची पहिली राष्ट्रपती देखील आहे. आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी स्वतंत्र भारतातील नागरिकांकडून ज्या अपेक्षा ठेवल्या होत्या त्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला वेगाने काम करावे लागेल. पुढील २५ वर्षात आपल्याला ‘सबका प्रयास, सबका कर्तव्य’ या दोन मार्गांवर वाटचाल करावी लागणार, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या. या २५ वर्षांत अमृतकाळ प्राप्तीचा मार्ग दोन महत्वाच्या मार्गांवर पुढे जाईल. त्यासाठी प्रत्येकाचे प्रयत्न आणि प्रत्येकाचे कर्तव्य या गोष्टी महत्वाच्या आहेत.

कोरोनाच्या लढाईत जनतेने दाखवलेला संयम, धैर्य उल्लेखनीय

काही दिवसांपूर्वीच भारताने कोरोना लसीचे २०० कोटी डोस लागू करण्याचा विक्रम केला आहे. या संपूर्ण लढाईत भारतीय जनतेने दाखवलेला संयम, धैर्य आणि सहकार्य हे एक समाज म्हणून आपल्या वाढत्या सामर्थ्याचे आणि संवेदनशीलतेचे प्रतीक आहे.

निसर्गाची सेवा केली पाहिजे

राष्ट्रपती पुढे म्हणाल्या की, माझा जन्म त्या आदिवासी परंपरेत झाला आहे, ज्याने हजारो वर्षांपासून निसर्गाशी एकरूप होऊन जीवन पुढे नेले आहे. माझ्या आयुष्यात जंगल आणि जलाशयांचे महत्त्व मला कळले आहे. आपण निसर्गाकडून आवश्यक त्या गोष्टी घेतो आणि तितक्याच आदराने निसर्गाची सेवा केली पाहिजे.

गरीब, दलित, मागासलेले आणि आदिवासी माझ्यामध्ये त्यांचे प्रतिबिंब पाहत आहे

“राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचणे ही माझी वैयक्तिक उपलब्धी नाही, ती भारतातील प्रत्येक गरिबाची उपलब्धी आहे. माझ्यासाठी ही खूप समाधानाची बाब आहे की, जे अनेक शतकांपासून वंचित होते, जे लोक राष्ट्रपतीपदापासून दूर होते. विकासाचे फायदे, ते गरीब, दलित, मागासलेले आणि आदिवासी माझ्यामध्ये त्यांचे प्रतिबिंब पाहत आहेत. आज मी सर्व देशवासियांना, विशेषतः भारतातील तरुणांना आणि भारतातील महिलांना खात्री देतो की, या पदावर काम करताना त्यांचे हित सर्वोपरी असेल. माझ्या या नियुक्तीनंतर आजच्या भारतातील तरूणांना नव्या वाटेवर चालण्याचे धाडसही मिळत आहे. अशा प्रगतीशील भारताचे नेतृत्व करताना आज मला अभिमान वाटतो.”

स्त्री शक्तीच्या भूमिकेला नवी उंची

नेताजी सुभाषचंद्र बोस, जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, बाबासाहेब आंबेडकर, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद यांसारख्या अगणित स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्याला राष्ट्राचा स्वाभिमान सर्वोच्च ठेवण्याची शिकवण दिली होती. राणी लक्ष्मीबाई, राणी वेलू नचियार, राणी गाईदिनलुय आणि राणी चेन्नम्मा यांसारख्या अनेक नायिकांनी राष्ट्ररक्षण आणि राष्ट्र उभारणीत स्त्री शक्तीच्या भूमिकेला नवी उंची दिली होती.

शिक्षक असतानाचा कार्यकाळ आठवला

मुर्मू पुढे म्हणाल्या की, काही वर्षांपूर्वी मला रायरंगपूर येथील श्री अरबिंदो इंटिग्रल स्कूलमध्ये शिक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. काही दिवसांनंतर, श्री अरबिंदो यांची १५० वी जयंती साजरी केली जाईल. श्री अरबिंदोच्या शिक्षणाविषयीच्या कल्पना मला सतत प्रेरणा देत आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पुढे म्हणाल्या की, संसदीय लोकशाही म्हणून ७५ वर्षात भारताने सहभाग आणि सहमतीने प्रगतीचा संकल्प पुढे नेला आहे. विविधतेने भरलेल्या आपल्या देशात आपण अनेक भाषा, धर्म, पंथ, खाण्यापिण्याच्या सवयी, राहणीमान, चालीरीती अंगीकारून ‘एक भारत – श्रेष्ठ भारत’ उभारण्यात सक्रिय आहोत.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

  • देशाच्या सर्वोच्च पदावर निवडून दिल्याबद्दल धन्यवाद, राष्ट्रपतीपदाची जबाबदारी मोठी. सर्व देशवासीयांचे आभार.
  • २६ जुलै हा कारगिल विजय दिवसही आहे. हा दिवस भारतीय सैन्याच्या शौर्य आणि संयम या दोन्हींचे प्रतीक आहे. आज मी कारगिल विजय दिवसानिमित्त देशाच्या सैन्याला आणि देशातील सर्व नागरिकांना माझ्या शुभेच्छा देते.
  • स्वतंत्र भारतात जन्मलेली मी देशाची पहिली राष्ट्रपती देखील आहे. आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी स्वतंत्र भारतातील नागरिकांकडून आपल्याकडून ज्या अपेक्षा ठेवल्या होत्या त्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला वेगाने काम करावे लागेल.
    पुढील २५ वर्षात आपल्याला ‘सबका प्रयास, सबका कर्तव्य’ या दोन मार्गांवर वाटचाल करावी लागणार. या २५ वर्षांत अमृतकाळ प्राप्तीचा मार्ग दोन मार्गांवर पुढे जाईल. जे प्रत्येकाचे प्रयत्न आणि प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
  • वॉर्ड काऊन्लिसर ते देशाच्या राष्ट्रपती होण्याची संधी मला मिळाली आहे. ही भारताची महानता असून लोकशाहीची ताकद आहे. यामुळेच एका गरिब घरातील जन्मलेली मुलगी देशाच्या सर्वोच्च पदावर पोहोचू शकते.
  • राष्ट्रपती होणं माझं वैयक्तिक यश नसून हे भारतातील प्रत्येक गरिबाचं यश आहे. भारतात गरीब स्वप्न पाहू शकतो आणि पूर्णही करु शकतो हेच यामधून सिद्ध होत आहे. अनेक वर्ष सुविधांपासून वंचित राहिलेल्या दलित, गरीब आदिवासी माझ्यात आपलं प्रतिबिंब पाहू शकतात.
  • ओडिशामधील छोट्याश्या आदिवासी गावातून माझा प्रवास सुरु झाला होता. तिथे प्राथमिक शिक्षण मिळणंही स्वप्नाप्रमाणे होतं. पण अनेक अडथळ्यांनंतरही मी संकल्प सोडला नाही. कॉलेजमध्ये जाणारी माझ्या गावातील मी पहिली व्यक्ती होती.
  • आज मी सर्व देशवासियांना, विशेषतः भारतातील तरुणांना आणि भारतातील महिलांना खात्री देते की, या पदावर काम करताना त्यांचे हित सर्वोपरि असेल. मी स्वातंत्र्य भारतात जन्मलेली पहिली महिला राष्ट्रपती, जनतेचं कल्याण हेच माझं ध्येय.
  • आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी नागरिकांकडून ज्या अपेक्षा केल्या आहेत, त्याची पूर्तता करण्यासाठी गतीने काम करावं लागणार आहे. ‘सबका प्रयास, सबका कर्तव्य’ या मार्गावर वाटचाल करावी लागणार आहे. भारताच्या उज्वल भविष्याचा प्रवास सर्वांच्या सोबतीने करायचा आहे.
  • आपल्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना मला ही संधी मिळाली आहे. देश आपल्या स्वातंत्र्याची ५० वर्ष साजरी करत असताना, माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली होती. आज ७५ व्या वर्षात मला ही नवी संधी मिळाली आहे. २५ वर्षाचं व्हिजन पूर्ण करण्यासाठी प्रयत्न होत असताना ही जबाबदारी मिळणं माझं सौभाग्य आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -