रत्नागिरी (हिं.स.) : दरडी कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन न्यायालयाच्या निर्देशानुसार परशुराम घाटात दोन ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आले आहेत.काही दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे.
या दरडींमुळे वाहतूक बंद ठेवण्याची वेळ येते. चौपदरीकरणामुळे या दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. चौपदरीकरणाच्या रखडलेल्या कामाबाबत अॅड. ओवेस पेचकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर ७ जुलैला सुनावणी झाली. न्यायालयाच्या सूचनेनुसार आता घाटात दोन ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
कल्याण टोलवेज कंपनीकडून घाटातील वरच्या बाजूस चार ठिकाणच्या दरडप्रवण क्षेत्रात कॅमेरे बसवण्यात आले आहेत. याच ठिकाणी शेडमध्ये त्याचे नियंत्रण युनिट बसवण्यात आले आहे. तेथे २४ तास कर्मचारी लक्ष ठेवत आहे. ईगल इन्फ्राकडून २ ठिकाणी कॅमेरे बसवण्यात आले आहेत.