नवी दिल्ली : आदित्य ठाकरे यांनी पर्यावरणमंत्री म्हणून गेल्या अडीच वर्षांच्या काळात घेतलेल्या निर्णयांचे आणि कामकाजाचे मोदी सरकारकडून ऑडिट होणार आहे. केंद्र सरकारकडून विशेषतः महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारभाराचे ऑडिट केले जाणार आहे.
केंद्र सरकारच्या रडारवर माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे असल्याचे दिसून येत आहे. केंद्र सरकारकडून आदित्य ठाकरेंच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळातील कामांसह निर्णयांचे ऑडिट होणार आहे.
आदित्य ठाकरेंकडील खात्याचे ऑडिट सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्र प्रदूषण मंडळातील कारभाराचे ऑडिट सुरु केले आहे.
मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर, चंद्रपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक, ठाणे, रायगड आदी विभागांतील कार्यालयात हे केंद्रीय ऑडिट सुरू करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात मुख्यालयाबरोबर नागपूर कार्यालयाचा समावेश आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्यात इतर विभागीय कार्यालयांचेही ऑडिट करण्याबाबत खातेप्रमुखांना सूचना देण्यात आल्या आहेत.
शिवसेनेचे ४० आमदार आणि १२ खासदारांनी बंड करत भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. यानंतर आता आदित्य ठाकरेंकडील खात्याच्या ऑडिटमुळे आदित्य ठाकरेंना भाजपने लक्ष केल्याचे दिसून येत आहे.