मुंबई (हिं.स.) : राज्यात आज ७८५ नवीन कोरोना बाधित रुग्णांचे निदान झाले. तर ६ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झालीहे. आज रोजी एकूण १४५३४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
आज ९३७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ७८,७२,४४४ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.९८% एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८४% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,२९,३६,०८८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८०,३५,०४६ (०९.६९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.