Sunday, October 26, 2025
Happy Diwali

सोलापूर विद्यापीठाच्या 'ईएनटीसी'च्या नमुना उत्तरपत्रिकेत २४ उत्तरे चुकीची

सोलापूर विद्यापीठाच्या 'ईएनटीसी'च्या नमुना उत्तरपत्रिकेत २४ उत्तरे चुकीची

सोलापूर (हिं.स.) विद्यापीठाच्या परीक्षांतील गोंधळाची मालिका सुरूच आहे. आता बी टेकच्या एका प्रश्नपत्रिकेच्या आदर्श नमुना उत्तरपत्रिकेतील ५० पैकी २४ उत्तरे चुकीची दिल्याचे आढळले आहे. या चुकीच्या उत्तरांच्या आधारे उत्तरपत्रिका तपासली गेल्यास सर्वच विद्यार्थी नापास होण्याची शक्यता आहे. हा प्रकार इलेट्राॅनिक्स अॅण्ड टेली कम्युनिकेशनच्या (इएनटीसी) अंतिम वर्षातील मायक्रोवेव्ह इंजिनिअरिंगच्या प्रश्नपत्रिकेबाबत घडला आहे.

विद्यार्थ्यांनी दिलेल्या उत्तरपत्रिकांच्या आपापल्या ओएमआर शीटवरील उत्तरपत्रिका कॉपी देण्याची मागणी केली आहे. ज्यायोगे विद्यापीठाच्या निकालावर विश्वास ठेवता येईल.

Comments
Add Comment