Friday, July 12, 2024
Homeमनोरंजनआलाय ‘दे धक्का २’चा अफलातून ट्रेलर

आलाय ‘दे धक्का २’चा अफलातून ट्रेलर

दीपक परब

हा चित्रपट निखळ मनोरंजन देणारा असणार हे ट्रेलरमधून दिसतंय. ज्येष्ठ निर्माते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या २००८ मध्ये आलेल्या ‘दे धक्का’ या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावले होते.

आता तब्बल १४ वर्षांनी ‘दे धक्का’ चित्रपटातील जाधव कुटुंब पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाले आहे. नुकताच ‘दे धक्का २’ या चित्रपटाचा अफलातून ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागातसुद्धा मकरंद जाधव आणि कुटुंबीय त्यांच्या जुन्या धमाल अंदाजात पुन्हा भेटीला येणार आहेत. यंदा जाधव कुटुंब कोल्हापुरातून थेट पोहोचले आहे लंडनमध्ये. राणीच्या देशात मराठमोळ्या जाधव कुटुंबाचा बोलबाला दिसून येणार आहे.

मकरंद जाधव, त्याची बायको सुमती, मुलगी सायली, मुलगा किस्ना, अतरंगी मेहुणा धनाजी, हेमल्या आणि तात्यांना भेटायला चाहते उत्सुक झाले आहेत. विशेष म्हणजे अभिनेते महेश मांजरेकर आणि आनंद इंगळे हे सुद्धा या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट निखळ मनोरंजन देणारा असणार हे ट्रेलरमधून दिसत आहे. या चित्रपटाचा सिक्वेल महेश मांजरेकर आणि सुदेश मांजरेकर यांनी दिग्दर्शित केला आहे. येत्या ५ ऑगस्ट रोजी ‘दे धक्का २’ रिलीज होणार आहे. यापूर्वी चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करून चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली होती. विशेष म्हणजे आज या चित्रपटातील पहिले गाणे रिलीज होणार आहे. अभिनेत्री नेहा शितोळे हिने हे गाणे लिहिले आहे. तिने लिहिलेल्या गीताचे बोल ‘देह पेटु दे’ असे आहेत. नेहाने चित्रपटातील या गाण्याचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. यावेळेस ही धमाल ट्रीप मुंबई-कोल्हापूर नाही, तर कोल्हापूर ते थेट लंडन असणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली होती. पोस्टरमध्ये लंडनची झलक पाहून यंदा धमाल आणि मनोरंजनाचा मोठा डोस प्रेक्षकांना मिळणार आहे, हे लक्षात येते.

दीपा परबचे पुनरागमन…

‘मन उडू उडू झालं’ या मालिकेच्या जागी ‘तू चाल पुढं’ ही मालिका सुरू होणार आहे. ही मालिका १५ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत दीपा परब प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. गृहिणीच्या आयुष्यावर भाष्य करणारी ही मालिका असून या मालिकेच्या माध्यमातून दीपा परब छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे.

‘नवा गडी नवं राज्य’; ८ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला

मराठी मालिकाविश्वात सध्या नवनवीन विषयांवरील मालिकांचे प्रयोग होत आहेत. आता ‘नवा गडी नवं राज्य’ ही मालिकाही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दोघींच्या संसाराची गोड गोष्ट सांगणारी ‘नवा गडी नवं राज्य’ ही मालिका ८ ऑगस्टपासून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

नागार्जुनच्या ‘द घोस्ट’चा टीझर रिलीज

 

साऊथ सुपरस्टार नागार्जुनच्या आगामी चित्रपट ‘द घोस्ट’चा टीझर रिलीज झाला आहे. ‘द घोस्ट’च्या टीझरमध्ये अभिनेता नागार्जुन एका खतरनाक अवतारात दिसत आहे. या चित्रपटात नागार्जुनचा अॅक्शन अवतार दिसणार आहे. यासोबतच निर्मात्यांनी नागार्जुनचा या चित्रपटातील लूकही शेअर केला आहे. हा टीझर व्हीडिओ सस्पेन्स आणि थ्रिलरने भरलेला आहे. चित्रपटाचा टीझर येताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. टीझरमध्ये नागार्जुनची स्टाईल आणि थरारक अॅक्शन सीन्सची झलक पाहून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -