Wednesday, July 9, 2025

वन्यप्राणी अवयवांची विक्री, सोलापूरात दोघांवर कारवाई

वन्यप्राणी अवयवांची विक्री, सोलापूरात दोघांवर कारवाई

सोलापूर (हिं.स.) : वन्य प्राण्यांच्या अवयवांची विक्री करणाऱ्यांच्या विरोधात वन विभागाने कारवाईची मोहीम सुरूच ठेवली आहे. सोलापूरच्या मंगळवार पेठेत वनौषधी विक्री करणाऱ्या दोन दुकानदारांकडून वन्यप्राण्यांचे अवयव, इतर वनोपज जप्त करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.


गेल्या आठवड्यात पंढरपूर येथील आषाढी वारीमध्ये वन्यप्राण्यांचे अवयव, इतर वनोपजाची विक्री करणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील आठ जणांना ताब्यात घेतले होते.


घोरपड वन्यप्राण्याचे जननेंद्रिय (हत्ताजोडी) विक्री व वन औषधी विक्री करणारे रवींद्र विरुपाक्ष ओनामे (वय ५१), मल्लिनाथ सिद्रामप्पा बनशेट्टी (वय ५८) यांच्याविरुद्ध वन विभागाने कारवाई केली. वन विभागाच्या पथकाने टाकलेल्या छापामध्ये त्यांच्या दुकानांमध्ये हत्ताजोडीचे ९७ नग, इंद्रजाल १२ नग, कस्तुरी मृग ८४ जप्त केले. त्याप्रकरणी न्यायालयाने ओनामे, बनशेट्टी यांना तीन दिवसांची वन कोठडीची शिक्षा दिली होती.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा