Tuesday, April 29, 2025

देशताज्या घडामोडी

केरळनंतर दिल्लीत आढळला मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण; देशातील रुग्णांची संख्या ४ वर

केरळनंतर दिल्लीत आढळला मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण; देशातील रुग्णांची संख्या ४ वर

नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेने या रोगाला “जागतिक आरोग्य आणीबाणी” घोषित केल्याच्या एका दिवसानंतर रविवारी दिल्लीत चौथ्या मंकीपॉक्स रुग्णाची नोंद झाली आहे. दिल्लीतील मंकीपॉक्सचा हा पहिलाच रुग्ण असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. हा रुग्ण ३१ वर्षांचा असून त्याचा प्रवासाचा इतिहास नाही. आता त्याच्यावर मौलाना आझाद मेडिकल कॉलेज, रुग्णालयात ताप आणि त्वचेच्या जखमांवर उपचार सुरू आहेत.

केरळमध्ये यापूर्वी मंकीपॉक्सची तीन प्रकरणे समोर आली होती. डब्ल्यूएचओने शनिवारी मंकीपॉक्सला आंतरराष्ट्रीय चिंतेची जागतिक सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केले होते. मंकीपॉक्स विषाणू संक्रमित प्राण्यांकडून अप्रत्यक्ष किंवा थेट संपर्काद्वारे मानवांमध्ये पसरतो.

Comments
Add Comment