Wednesday, October 29, 2025
Happy Diwali

धारावीत प्रसिद्ध कबड्डीपटूची हत्या

धारावीत प्रसिद्ध कबड्डीपटूची हत्या

मुंबई (हिं.स.) : एका २६ वर्षीय प्रसिद्ध कबड्डीपटूची डोक्यात स्टम्प घालून हत्या झाल्याची घटना धारावीत घडली आहे. विमल राज नाडार असे त्याचे नाव असून तो धारावीतील एका चाळीत राहत होता. या घटनेनंतर त्याला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, ३२ वर्षीय आरोपी मालेश चिताकांडी आणि विमल एकाच चाळीत राहत होते. काही कारणांमुळे त्यांच्यात वाद निर्माण झाले होते. त्यामुळे सतत त्यांच्यात काही ना काही कारणांमुळे खटके उडायचे. त्यादिवशीही घराबाहेर मोठ्या आवाजात बोलत असल्यामुळे त्यांच्यात वाद झाले. त्या रागातून त्याने विमलला एका ठिकाणी गाठून त्याच्या डोक्यात स्टम्प घातला. या हल्ल्यानंतर विमल जागीच कोसळला. बराच वेळानंतर त्याला तेथील स्थानिकांनी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते. याप्रकरणाचा पुढील तपास सुरु करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Comments
Add Comment