Friday, July 19, 2024
Homeमहत्वाची बातमीमहामार्ग बांधणीतून नागपूरच्या प्रगती- विकासाचा मार्ग सूकर : नितीन गडकरी

महामार्ग बांधणीतून नागपूरच्या प्रगती- विकासाचा मार्ग सूकर : नितीन गडकरी

नागपूर (हिं.स) : केंद्रीय परिवहन आणि महामार्ग मंत्री- नागपूरचे खासदार नितीन गडकरींनी रविवारी धापेवाडा परिसर व एकूणच नागपूर जिल्ह्यात आधुनिक रस्त्यांचे जाळे मजबूत करण्यासाठी धापेवाडा, नागपूर येथे २८.८८ किमी लांबीच्या व ७२० कोटी रु. किंमत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग ५४७-ई च्या सावनेर – धापेवाडा – गौंडखैरी सेक्शन चौपदरीकरणाचे लोकार्पण केले. यावेळी खासदार कृपाल तुमाने, माजी मंत्री व आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार टेकचंद सावरकर, विठ्ठल मंदिराचे विश्वस्त तसेच अधिकारी व इतर मान्यवरांच्या उपस्थित होते.

ट्वीटर द्वारे माहिती देताना नितीन गडकरी म्हणाले,

“सावनेर – धापेवाडा – गौंडखैरी सेक्शनच्या चौपदरीकरणामुळे परिसरातील अदासा येथील सुप्रसिद्ध गणेश मंदिर व धापेवाडा येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर या स्थळांसाठी यात्रेकरूंना उत्तम कनेक्टिविटी मिळेल. चंद्रभागा नदीवरील नवीन ४-लेन पुलामुळे धापेवाडा येथील ट्रॅफिक जामपासून मुक्तता मिळेल व प्रवास सुरक्षित होईल. प्रदेशातील कृषी व स्थानीय उत्पादनांची मोठ्या बाजारपेठांपर्यंतची पोहोच सुलभ होईल.

६.२ किमीच्या ग्रीनफिल्ड कळमेश्वर बायपासमुळे कळमेश्वर शहरातील वाहतुक सुरळीत व सुरक्षित होईल. महामार्गावरील रेल्वे उड्डाणपुल, व्हेईक्युलर अंडरपास, उड्डाणपुल व ओव्हरपासच्या प्रावधानांमुळे परिसरातील वाहतूक सुरळित व सुरक्षित होण्यास मदत होईल. गोंडखैरी व चिंचभवन भागातील लॉजिस्टिक व इंडस्ट्रीयल पार्कमध्ये वृद्धी होईल. तसेच भोपाळ, इंदोर येथून मुंबई, हैदराबाद ला ये-जा करणाऱ्या अवजड वाहतुकीपासून नागपूर शहराला मुक्तता मिळेल. नागरिकांचा प्रवास सुरक्षित होईल व वेळेची बचत होईल.

आजच्या लोकार्पण कार्यक्रमादरम्यान गोंडखैरी ते सावनेर सेक्शनमध्ये लाईट लावण्यासाठी ९ कोटी रुपये तसेच पुलाच्या सौंदर्यीकरणासाठी ४० लाख रुपयांच्या निधीला मंजूरी देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली महामार्ग बांधणीतून नागपूर जिल्ह्याच्या प्रगती आणि विकासाचा मार्ग सूकर करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.”

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -