Sunday, July 14, 2024
Homeकोकणरत्नागिरीआंतरराज्य नेमबाजी स्पर्धेत आरवलीच्या रुई विचारे हिची चमकदार कामगिरी

आंतरराज्य नेमबाजी स्पर्धेत आरवलीच्या रुई विचारे हिची चमकदार कामगिरी

देवरूख (प्रतिनिधी) : चंदिगड येथे ६ जुलै रोजी पार पडलेल्या एनसीसी आंतरराज्यीय नेमबाजी क्रीडा स्पर्धेत संगमेश्वर तालुक्यातील आरवलीची सुकन्या असलेल्या रुई विनायक विचारे हिने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना चमकदार कामगिरी केली आहे. या कामगिरीबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंगळवारी (१९ जुलै ) रुईसह महाराष्ट्राला विजेतेपद मिळवून देणाऱ्या कॅडेट्सचा गौरव केला.

चंदिगड येथे ६ जुलै रोजी पार पडलेल्या आंतरराज्यीय एनसीसी नेमबाजी क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रातून विविध गटांमधून १७ कॅडेट्स सहभागी झाले होते. रूई विचारे हिचाही समावेश होता. मूळची संगमेश्वर तालुक्यातील आरवलीची सुकन्या असलेली रुई विचारे ही सध्या पुण्यातील गरवारे महाविद्यालयामध्ये पदवी अभ्यासक्रमातील द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे. महाराष्ट्रामधून चंदिगडमधील स्पर्धेत सहभागी झालेल्या रुई विचारे हिने ५० मीटर रायफल शूटिंग प्रकारात चमकदार कामगिरी केली. तिने तिच्या गटातून खेळताना संपूर्ण भारतात दुसरा क्रमांक पटकावला आहे.

पन्नास मीटर रायफल शूटिंगमध्ये तामिळनाडूतील मुलीने प्रथम, तर रुई विचारे हिने दुसरे स्थान पटकावले. कॅडेट्सनी महाराष्ट्र राज्याला सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपद पटकावून दिले. याची दखल घेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या कॅडेट्सना मंगळवारी १९ जुलैला राजभवनात बोलावून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -