पनवेल : राज्यात सत्तांतर झाले ते फक्त जनतेसाठी, हे सरकार यावे ही तर श्रींची इच्छा… हे सरकार यावे ही महाराष्ट्रातील जनतेची इच्छा होती, असे भाजप नेते व राज्याचे उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीस आपल्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना उद्देशून म्हणाले. भाजपची प्रदेश कार्यकारिणी बैठक पनवेल येथे पार पडत आहे. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, ”महाराष्ट्राच्या रयतेचे राज्य आल्यानंतर भाजपची पहिली कार्यकारिणी रायगड जिल्ह्यात होत आहे याचा मला अभिमान आहे. राज्यातील सत्तेचा गड आपण जरी जिंकलो असलो तरी मोदींनी विकासाची जी यात्रा सुरू केली आहे त्या यात्रेतील गड जिंकल्याशिवाय आपल्याला गप्प बसायचं नाही. गेली अडीच वर्ष महाविकास आघाडीने सूडाचं राजकारण केलं आहे. हे वर्षे खूप संघर्षाचे गेले आणि या अडीत वर्षात महाराष्ट्र खूप मागे गेला, प्रगतीची सर्व कामे थांबली गेली, केंद्राने कोट्यावधी रूपये दिली ते काम मागच्या सरकारने बंद केले पण सत्य परेशान हो सकता है लेकीन पराजित नही.. त्यामुळे राज्यात हे सत्तांतर झाले आहे ते फक्त सत्तेसाठी नाही तर जनतेसाठी आहे.” असा दावा फडणवीसांनी केला.
“राज्यात पहिल्यांदाच सत्तेतील ४० आमदार सत्ता सोडून विरोधी पक्षात येत आहेत. कारण त्यांना माहिती होते की आपण येथे राहिलो तर संपणार आहोत. कारण ज्यांच्या विरोधात लढलो त्यांच्या अधिपत्याखाली काम करावं लागत होतं हे त्यांना कळलं होतं आणि सरकारमधून मावळे बाहेर पडले. शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेचे मी मनापासून अभिनंदन करतो. आता आमच्यासोबत जे आले तीच खरी शिवसेना आहे.” असे मत फडणवीसांनी व्यक्त केले.
मला नेत्यांनी सेनापती बनवलं आणि माझ्यामाहे भक्कमपणे उभे राहिले आणि हे जनतेचं सरकार स्थापन झालं. मला जेष्ठांनी मला उपमुख्यमंत्र्यांची शपथ घ्यायला लावली हा माझा सन्मान आहे. मला सरकारमध्ये राहून सरकार चालवा असं त्यांनी सांगितलं. आता मागच्या अडीच वर्षाचा बॅकलॉग आपल्याला भरून काढायचा आहे असा इशारा फडणवीसांनी दिला आहे.