डोंबिवली (वार्ताहर) : मुंबईकडून विदर्भाकडे चालेल्या धावत्या एक्स्प्रेसमधील एका प्रवाशाला डोंबिवली रेल्वे स्थानक येत असताना रेल्वे तिकीट तपासनीसाने तिकीट विचारले. त्यावेळी त्याच्याजवळ तिकीट नसल्याने प्रवाशाने तिकीट तपासनीसाशी हुज्जत घालून त्यांना शिवागीळ आणि मारहाण केली. हा प्रकार डोंबिवली स्थानकादरम्यान घडला होता.
एक्सप्रेस वेगात असल्याने तिकीट तपासणीला डोंबिवली रेल्वे स्थानकात उतरून त्या प्रवाशाविरुद्ध गुन्हा दाखल करता आला नाही. तपासनीसाने मनमाड रेल्वे स्थानकातील पोलीस ठाण्यात या मारहाणप्रकरणी तक्रार केली. त्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून मनमाड पोलिसांनी तो अधिक तपासासाठी डोंबिवली लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग केला आहे. राजेशकुमार गुप्ता (४२) हे विदर्भ एक्स्प्रेसमध्ये तिकीट तपासण्याचे काम करत होते. मुंबईकडून ही एक्सप्रेस कल्याणकडे जात असताना प्रत्येक डब्यातील प्रवाशाचे तिकीट ते तपासत होते. डोंबिवली रेल्वे स्थानकातून एक्स्प्रेस कल्याणच्या दिशेने धावत असताना विजयन शिवा पेरुमल (३४, रा. कल्याण) या प्रवाशाला तपासनीसाने तिकीट विचारले.
विजयन याने तिकीट ते हरवल्याचे दृश्य उभे केले. तिकीट राजेशकुमार यांना विजयन विनातिकीट प्रवास करत असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी त्याला दंड भरण्यास सांगितले. त्याचा राग विजयनला आल्याने राजेशकुमार यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. इतर प्रवासी मध्ये पडले. त्यांनी टीसीला मारहाणीपासून रोखले. तपासनीस राजेशकुमार याने मनमाड पोलीस ठाण्यात विजयनविरुद्ध तक्रार केली. पोलिसांनी तपास त्या प्रवाशाचा शोध सुरू केला आहे.