Thursday, July 10, 2025

चंद्रपुरात पुन्हा संततधार, इरई धरणाचे सातही दरवाजे उघडले

चंद्रपुरात पुन्हा संततधार, इरई धरणाचे सातही दरवाजे उघडले

चंद्रपूर : चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील बहुतांश भागात मागील १२ तासापासून संततधार पाऊस सुरू आहे. दरम्यान पाण्याची वाढती पातळी लक्षात घेता पुन्हा इरई धरणाचे सातही दरवाजे उघडण्यात आलेले आहेत. दरम्यान त्यामुळे आसपासच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.


२२ जुलैच्या रात्रीपासून चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. पावसामुळे इरई धरण भरले असून पाण्याची पातळी स्थिर ठेवण्यासाठी शनिवारी सकाळपासून टप्प्याटप्याने दरवाजे उघडण्यात आले आहेत. पाण्याची वाढती पातळी लक्षात घेता इरई धरणाचे सातही दरवाजे ०.५० मीटरने उघडण्यात आलेले आहेत. त्यात दर एका तासाने पुन्हा ०.५० मीटरने वाढ करण्यात येणार आहे. परिणामी इरई नदी दुथडी भरून वाहत आहे. असाच पाऊस सुरू राहिला तर नदीतील पाण्याची पातळी वाढून पूर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आसपासच्या गावांना सतर्क करण्यात आले आहे.

Comments
Add Comment