Friday, October 24, 2025
Happy Diwali

रत्नागिरीसाठी वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी – उदय सामंत

रत्नागिरीसाठी वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी – उदय सामंत

रत्नागिरी (हिं.स.) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी दिली असून, समितीही स्थापन करण्यात आली आहे. येथील वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न मार्गी लागणार असल्याने जिल्हा रुग्णालयासह ग्रामीण भागातील वैद्यकीय अधिकार्यांचा प्रश्नही सुटणार आहे, असे आमदार उदय सामंत यांनी सांगितले.

माजी मंत्री आणि रत्नागिरीचे आमदार उदय सामंत रत्नागिरी दौ-यावर आले असता त्यांनी विविध विकासकामांबाबत आढावा घेतला. याचवेळी मोठ्या संख्येने रत्नागिरी शहर व ग्रामीण भागातील नागरिकांनी सामंत यांची भेट घेऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी पाली येथील निवासस्थानी अनेक पदाधिकारी आणि नागरिकांनी त्यांची भेट घेतली. दुपारनंतर सामंत हे रत्नागिरीतील विश्रामगृहावर आले होते. त्यांनी रत्नागिरीत आल्यानंतर बांधकाम विभाग, जिल्हा रुग्णालयासह विविध विभागाच्या अधिकार्यांशी चर्चा केली.

विकासकामांबरोबरच जिल्हा रुग्णालयातील समस्या सोडवण्याच्या दृष्टीने त्यांनी मुंबईतील अधिकार्यांशी संपर्क केला. डॉक्टरांची संख्या वाढावी यादृष्टीने आढावा घेतला. जिल्हा रुग्णालयातील भूलतज्ज्ञांचा प्रश्न सुटण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सामंत यांनी सांगितले.

Comments
Add Comment