Saturday, October 25, 2025
Happy Diwali

राज्यात २३३६ नवीन कोरोना बाधित रुग्णांचे निदान, एकूण १४५९९ ॲक्टिव्ह रुग्ण

राज्यात २३३६ नवीन कोरोना बाधित रुग्णांचे निदान, एकूण १४५९९ ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई (हिं.स.) : राज्यात आज २३३६ नवीन कोरोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. तर ५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आज रोजी एकूण १४५९९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

आज २३११ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ७८,६९,५९१ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.९७% एवढे झाले आहे.

सध्या राज्यातील मृत्यूदर १.८४% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,२८,७८,३०० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८०,३२,२४६ (०९.६९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

Comments
Add Comment