Sunday, June 22, 2025

नीरव मोदीची हाँगकाँगमधील २५० कोटींची संपत्ती जप्त

नीरव मोदीची हाँगकाँगमधील २५० कोटींची संपत्ती जप्त

नवी दिल्ली (हिं.स.) : पंजाब नॅशनल बँकेत (पीएनबी) १० हजार कोटींचा घोटाळा करुन फरार झालेला मुख्य आरोपी नीरव मोदीला ईडीने मोठा दणका दिला आहे. नीरव मोदीची हाँगकाँगमधील सुमारे अडीचशे कोटींची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. या कारवाईत जप्त केलेल्या संपत्तीमध्ये काही रत्न आणि ज्वेलरीसह बँकेतील रक्कमेचा समावेश आहे.


नीरव मोदीची हाँगकाँगच्या बँकेत ३०.९८ मिलियन अमेरिकन डॉलर आणि ५.७५ मिलियन हाँगकाँग डॉलर इतकी रक्कम होती. यासंपूर्ण संपत्तीची एकत्रित रक्कम २५३.६३ कोटी रुपये होते, ईडीने आपल्या निवदेनात ही माहिती दिली आहे. पंजाब नॅशनल बँकेला ६४९८.२० कोटी रुपयांचा चुना लावल्या प्रकरणी नीरव मोदीचा ईडी, सीबीआयकडून तपास सुरु आहे.


यादरम्यान नीरव मोदी ग्रुप ऑफ कंपनीजची हाँगकाँगमध्ये काही मालमत्ता जी रत्ने आणि ज्वेलरीच्या रुपात तसेच खासगी बँकेच्या व्हॉल्टमध्ये काही रक्कम असल्याचे उघड झाले होते. त्यानुसार ईडीने ही ताजी कारवाई केली आहे. यापूर्वी ईडीने नीरव मोदी आणि त्याच्याशी संबंधीत व्यक्तींची भारत आणि विदेशातील २ हजार ३९६.४५ कोटींची चल आणि अचल मालमत्ता जप्त केली होती.

Comments
Add Comment