Friday, July 19, 2024
Homeमहत्वाची बातमीजनहिताची तळमळ असणारे नेतृत्व

जनहिताची तळमळ असणारे नेतृत्व

देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने राज्याला तरुण, कल्पक आणि जनहिताची तळमळ असणारे नेतृत्व लाभले आहे. आमदार म्हणून पाचवी टर्म असल्यामुळे त्यांची विधिमंडळ कामकाजावर चांगली पकड आहे. सर्व विषयांचा दांडगा अभ्यास असल्यामुळे राज्याच्या विकासाची एका अर्थाने ब्ल्यू प्रिंट त्यांच्याकडे आहे. प्रत्येक प्रश्नांवर सखोल अभ्यास करण्यावर त्यांचा भर असतो. वाढदिवसानिमित्त या नेतृत्वाच्या खास पैलूंचा वेध.

अत्यंत स्वच्छ प्रतिमा आणि जनहितासाठी ठोस निर्णय घेण्याची क्षमता असलेले मुख्यमंत्री अशी देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा निर्माण झाली आहे. जनहितासाठी प्रसंगी बोजड वाटणारे निर्णय घ्यायलाही ते मागेपुढे पाहत नाहीत. तरुण वयातील नगरसेवक तसेच महापौर म्हणूनही त्यांची कामगिरी वाखाणण्याजोगी राहिली. १९९९ मधील विधानसभा निवडणुकीत ते प्रथम निवडून आले. त्यानंतर २००४, २००९ आणि २०१४, २०१९ अशा रितीने आमदार म्हणून त्यांची ही पाचवी टर्म आहे. या प्रदीर्घ अनुभवामुळे देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ कामकाजावर चांगली पकड आहे. सर्व विषयांचा दांडगा अभ्यास हे त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य. त्यामुळे संपूर्ण राज्याच्या विकासाची एका अर्थाने ब्ल्यू प्रिंट त्यांच्याकडे आहे. ते विकासाचा सर्वसमावेशक विचार करतात. त्यात गोर-गरीब, आदिवासी, इतर वर्ग या साऱ्यांचा समावेश असतो. देवेंद्र फडणवीस हे नेहमीच सकारात्मक विचार करतात. त्यामुळे त्यांच्यासमोर आलेल्या कोणत्याही प्रश्नातून मार्ग निघतोच. प्रत्येक प्रश्नावर सखोल अभ्यास करण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे त्या त्या प्रश्नाचे सर्व कंगोरे त्यांना माहीत होतात आणि त्या प्रश्नावर मार्ग काढणे शक्य होते. त्यांना राज्याचे अर्थकारण तसेच बजेट प्रोसेसिंगची उत्तम माहिती आहे. त्यामुळे कोणतेही काम अधिकाऱ्याकडून करून घेणे किंवा शासनाच्या निर्णयाच्या अंमलबजावणीबाबत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणे त्यांना शक्य होते.

आवश्यकता भासेल तेव्हा चौकटीबाहेर जाऊन निर्णय घेण्याचीही क्षमता देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. सरकार आणि प्रशासन यांच्यातील योग्य समन्वयाचा, सहकार्याचा मुद्दा सातत्यानं समोर येतो. अर्थात, ज्या तळमळीने, गतीने प्रशासकीय यंत्रणांनी काम करावे तितके ते होत नाही, हे खरे असले तरी या यंत्रणांचे म्हणून काही मुद्दे असतात, हेही लक्षात घेेणे गरजेचे आहे. प्रशासकीय यंत्रणेने तातडीने, प्रभावी काम केल्याचीही उदाहरणे आहेत. लातुरला रेल्वेने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय आणि त्याची अंमलबजावणी हे याचे उत्तम उदाहरण आहे. ही योजना अवघ्या ११ दिवसांत कार्यान्वित झाली. विविध सरकारी यंत्रणांमधील योग्य समन्वय तसेच अव्याहत काम करण्याची तयारी यामुळेच हे आव्हान पेलणे शक्य झाले, हेही यातून दिसून आले. आजही शिदेंसोबत देवेंद्र फडणवीस गतिमान व लोकाभिमुख कारभार करत आहेत. राज्याच्या या नि:स्पृह, कल्पक व जनकल्याणाची तळमळ असणाऱ्या नेतृत्वाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा!

अतुल भातखळकर

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -