Monday, October 7, 2024
Homeमहत्वाची बातमीराज्यात उंच इमारतींसाठी आता ‘फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट’ अनिवार्य

राज्यात उंच इमारतींसाठी आता ‘फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट’ अनिवार्य

उर्जा विभागाचे परिपत्रक जारी

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील ७० मीटर किंवा त्याहून अधिक उंचीच्या इमारतींमध्ये मानांकन असलेले ‘फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट’ बसवणे आता लवकरच बंधनकारक करण्यात येणार आहे. राज्याच्या ऊर्जा विभागाने महानगरपालिका आणि अग्निशमन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एक महत्त्वाचे परिपत्रक जारी केले आहे. न्यायालयाच्या निर्देशानंतर तातडीने ही कारवाई करण्यात येणार आहे.

अग्निशमन अधिकाऱ्यांना दुर्घटनेवळी उंच मजल्यापर्यंत पोहोचण्यासाठी अधिक सुरक्षित आणि जलद मार्ग म्हणून आता ‘फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट’ चा पर्याय असणार आहे. दरम्यान, उंच इमारतींमधील आगीच्या आपत्कालीन परिस्थितीत अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी हा सर्वात सुरक्षित तसेच जलद मार्गांपैकी एक असणार आहे. जानेवारी २०१८ पासून ७० मीटर आणि त्याहून अधिक उंचीच्या इमारतींसाठी फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट अनिवार्य करणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य बनले आहे.

मुंबईसारख्या शहरांमध्ये उंच इमारतींच्या अनेक विकासकांनी कमी दर्जांची फायर इव्हॅक्युएशन सोल्यूशन्स किंवा लिफ्ट्स बसविल्या आहेत. तथापि, बांधकाम व्यावसायिक आणि नियमित प्रवासी लिफ्ट निर्मात्यांद्वारे गुणवत्तेशी तडजोड केल्यामुळे ही मानांकन नसलेले फायर सोल्युशन्स/इव्हॅक्युएशन लिफ्ट लोकांना आग लागल्यास योग्य सुरक्षा प्रदान करू शकत नाहीत. याउलट, फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट्स हा अधिक सुरक्षित आणि खात्रीशीर पर्याय आहे. सदरील फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट उत्पादकांच्या विशेष टीमद्वारे विकसित केली जाते. हे अग्निशामकांना उच्च मजल्यापर्यंत जलद पोहोचण्यासाठी आणि पाळीव प्राण्यांसह सर्व वयोगटातील नागिरकांना तीन मिनिटांपेक्षा कमी वेळेत बाहेर काढण्यास सक्षम आहे. हे इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमला आगीशी लढण्यासाठी, जीव आणि मालमत्ता वाचवण्यासाठी एका मिनिटात कोणत्याही मजल्यावर पोहोचण्यास सक्षम करते आणि त्यामुळे नुकसान कमी होते.

आता नवीन परिपत्रकानुसार, यापुढे, महाराष्ट्र राज्यात फायर इव्हॅक्युएशन लिफ्टच्या उभारणीसाठी परवानगी आणि परवाना घेणे बंधनकारक असणार आहे. नवीन मार्गदर्शक सुचनांची अंमलबजावणी प्रस्तूत फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट इंस्टॉलेशन्ससाठी जारी केल्याच्या तारखेपासून ताबडतोब प्रभावी होईल आणि विद्यमान फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट इंस्टॉलेशन्सना पूर्वलक्षी प्रभावाने लागू होईल. असेही या परिपत्रकात म्हटले आहे.

दरम्यान, राज्यात महाराष्ट्र लिफ्ट कायदा तयार करण्यात येत असून त्यानुसार सर्व इमारतींमध्ये अशा पद्धतीची लिफ्ट बसवण्यात येणार आहे, त्याबाबत नेमकी काय मार्गदर्शक तत्वे पाळावी. लिफ्ट नेमकी कोणत्या बाजूला असावी, त्याची वैशिष्ट्ये काय असावी यासंदर्भात सर्व बाबी त्यात नमूद असतील अशी माहिती मुख्य इलेक्ट्रीकल अधिकारी दिनेश खोंडे यांनी दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -