वडखळ (वार्ताहर) : पावसाळ्यात बंद असलेली मासेमारी मोहीम टप्प्याटप्प्याने सुरू झाली आहे. वादळी पावसाचा अंदाज दररोज घेतला जातोय. वर्षा पर्यटनासाठी काही पर्यटकांची मंदी माळी वडखळ, पेण, अलिबाग, जेटीवर बुधवारपासून दिसून येत आहे. या मोसमात ताजी मासळी मिळत असते विशेष करून मोठे गडगटे, पांढरे बोंबील आणि ताज्या पापलेट मासळीचा आस्वाद घेण्यासाठी खवय्ये अधीर झालेले दिसतात.
खरे सांगायचे, तर श्रावण महिन्यातच अशी मासळी भरपूर मिळते आणि अन्य दिवसांच्या तुलनेत स्वस्तदेखील असते अलिबाग, रेवस, मुरुडच्या समुद्रात सध्या बोंबिलांची आवक वाढली आहे. श्रावण हा व्रतवैकल्याचा महिना सुरू होत असल्याने अनेकजण मांसाहार वर्ज करून महिनाभर उपवास करतात. अलिबाग, वडखळ, पेणच्या मासळी मार्केटमध्ये बोंबील, कोळंबी, पापलेट, खेकडे, कालव, अंबड अशी मासळी काही प्रमाणात विक्रीस येत आहे.
मात्र गरगटे बोंबील किंवा मोठी पापलेट मात्र दिसून येत नाहीत. लहरी बदलणारे हवामानामुळे खोल मासेमारीस जाण्यास धारिष्ट्य कोळी बांधवांनी दाखविलेले नाही. २५ ते ३० वाव खोल समुद्रात गेल्यावरच वादळी हवा अथवा लाटांचे तांडव दिसून येते, अशी माहिती काही अनुभवी मच्छीमारांनी दिली.