Sunday, July 21, 2024
Homeताज्या घडामोडीराष्ट्रवादीचे सर्व विभाग आणि सेल बरखास्त

राष्ट्रवादीचे सर्व विभाग आणि सेल बरखास्त

शरद पवारांचा मोठा निर्णय

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीचा धसका घेतलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय स्तरावरील सर्व विभाग आणि सेल बरखास्त केले आहेत. या निर्णयानंतर अनेक इच्छूकांनी या निर्णयाचे स्वागत केले आणि आता आम्हाला संधी द्या असा आग्रह धरला आहे. परंतू, राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे विभाग आणि सेल तडकाफडकी बरखास्त करण्याचा हा निर्णय नेमका का घेण्यात आला आहे, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी प्रफुल पटेल यांनी केलेल्या या ट्विटमुळे खळबळ उडाल्यानंतर मग हा निर्णय महाराष्ट्र किंवा इतर कोणत्याही राज्य घटकाला लागू होणार नाही, असा आणखी एक ट्विट त्यांनी केल्याने कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून शिवसेना पक्षप्रमुखांची झोप उडवल्यानंतर आता महाराष्ट्रात रोजच नवनव्या राजकीय घडामोडी घडत आहेत.

शिवसेनेमध्ये झालेल्या बंडखोरीमुळे  ठेच लागलेल्या उद्धव ठाकरे यांचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून पवारांनीही आपल्या पक्षात कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी आता नविन कात टाकण्यात येणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -