Sunday, March 23, 2025
Homeताज्या घडामोडीद्रौपदी मुर्मू देशाच्या १५व्या राष्ट्रपती

द्रौपदी मुर्मू देशाच्या १५व्या राष्ट्रपती

नवी दिल्ली : केंद्रातील सत्ताधारी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या देशाच्या १५व्या राष्ट्रपती ठरल्या आहेत. त्या देशाच्या पहिल्या आदिवासी व दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत. राष्ट्रपतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू या प्रचंड मतांनी विजयी झाल्या. पहिल्याच फेरीत त्यांना ५४० मतं मिळाली. पहिली फेरी पूर्ण होताच देशभरात आनंदोत्सवाला सुरुवात झाली. देशातील पहिली आदिवासी महिला राष्ट्रपती पदावर निवडून आल्याने सर्वंच ठिकाणाहून आनंदाचा वर्षाव होत आहे. आदीवासी पाड्यांवर देखील मोठ्या प्रमाणात आनंदोत्सव करण्यात आला.

राष्ट्रपतीपदासाठी १८ जुलै रोजी मतदान झाल्यानंतर आज गुरुवारी (ता. २१) जुलै रोजी सकाळी ११ वाजता संसद भवनात मतमोजणीला सुरुवात झाली. या निवडणुकीत एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आणि विरोधी पक्षातर्फे यशवंत सिन्हा हे दोन उमेदवार रिंगणात होते. विशेष म्हणजे १५ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी प्रतिभाताई पाटील यांच्या रूपाने देशाला पहिल्या महिला राष्ट्रपती मिळाल्या होत्या. यंदाच्या निवडणूकीतही महिला उमेदवार असल्याने निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पहिल्याच फेरीत भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना ५४० मतं मिळाली. तर विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना अवघी २०८ मतं मिळाली. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत १५ खासदारांची मतं अमान्य ठरली.

दरम्यान, मुर्मू यांच्या विजयानंतर पोस्टरमध्ये द्रौपदी मुर्मूंसोबत इतर कोणत्याही नेत्याचा फोटो लावू नये, अशा सक्त सूचना पक्ष कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीपासून पक्षाने २०२४ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे मानले जात आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -