मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार गजानन कीर्तिकर यांची भेट घेतली. गजानन कीर्तिकर हे सध्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. त्यामुळे आता गजानन कीर्तिकर देखील शिंदे गटात सामील होणार का, असा प्रश्न विचारला जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज गजानन कीर्तिकर यांच्या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली. शिवसेनेचे उत्तर-पश्चिम मतदारसंघाचे खासदार गजानन कीर्तिकर हे काही दिवसांपासून आजारी असल्यामुळे घरीच आहेत. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी एकनाथ शिंदे त्यांच्या भेटीला गेले. सगळ्यांच्या उपस्थितीत दोघांमध्ये चर्चा झाली. कीर्तिकर यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यात आली. दरम्यान ही सदिच्छा भेट असल्याचे म्हटले जात आहे.