मुंबई : महाआघाडी सरकारमधले अनेक मंत्री, शिवसेना नेते भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या रडारवर होते. अनिल परब, प्रताप सरनाईक, भावना गवळी, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊतांवरही कारवाई करण्याची मागणी ते करत होते. काल मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीने अटक केल्याच्या पार्श्वभूमीवर सोमय्यांनी आता संजय राऊतांची पाळी, असे ट्वीट केले आहे.
_ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
Ab #SanjayRaut ki Bari Hai
_ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
अब संजय राऊत की बारी है @BJP4India @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) July 20, 2022
सोमय्या यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे आणि आरोपांमुळे अनेक शिवसेना तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांना चौकशीला सामोरे जावे लागले आहे. आता संजय राऊतांची पाळी आहे, असे सूचक ट्वीट किरीट सोमय्या यांनी केले आहे. त्यामुळे आता संजय राऊतांच्या ईडी चौकशीकडे लक्ष लागले आहे.
आज मुंबई ईडी कार्यालयात संजय राऊत यांना हजर राहण्याचे समन्स आले आहे. गोरेगाव पत्राचाळ जमीन घोटाळ्यासंदर्भात चौकशीसाठी त्यांना हे समन्स आहे. मात्र पावसाळी अधिवेशन दिल्लीत सुरू आहे. त्यामुळे राऊत यांचे वकील वेळ मागून घेणार असल्याची माहिती आहे.
गोरेगाव पत्राचाळ जमीन घोटाळ्याविषयी किरीट सोमय्या यांनी पाठपुरावा केला होता. काल याआधी ही सोमय्या यांनी अनिल देशमुख, नवाब मलिक तसेच अनिल परब यांना चौकशीला सामोरे जावे लागले आहे आणि आता संजय राऊत यांना देखील चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.