अटारी : पंजाबी सिंगर सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील गँगस्टर आणि पंजाब पोलीस यांच्यात अटारी बॉर्डरजवळ चकमक उडाली. यात एक शूटर जगरूपसिंग याचा खात्मा करण्यात आला आहे. या एन्काउंटरमध्ये तीन पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचेही वृत्त आहे. अटारी बॉर्डरजवळ अजूनही पोलीस आणि गँगस्टर यांच्यात गोळीबार सुरू आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, पोलिसांच्या अनेक गाड्या भारत-पाक सीमेच्या दिशेने एनकाउंटर टीमच्या मदतीसाठी पोहोचत आहेत. एका निर्जन ठिकाणी असलेल्या एका जुन्या हवेलीत जगरूप सिंग रूपा आणि मन्नू कुसा हे दोन गँगस्टर्स लपून बसले होते.
गँगस्टर जगरूप सिंग (रूपा) संदर्भात माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. यानंतर दोन्हीकडूनही जबरदस्त फायरींग सुरू झाली. यानंतर अनेक राउंड्स फायर झाले. जगरूप सिंग रूपा आणि मन्नू कूसा हे दोघेही शार्प शूटर्स आहेत. पोलीस सूत्रांनी दिेलल्या माहितीनुसार, या चकमकीत रुपाचा खात्मा झाला आहे. तर मनू एके-४७ ने सातत्याने फायरिंग करत आहे. या चकमकीत तीन पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.