नवी दिल्ली (हिं.स) : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात राष्ट्रपती मनोनित राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेतल्यानंतर पीटी उषा यांनी बुधवारी संसद भवन परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदींची सदिच्छा भेट घेत संवाद साधला. मोदींनी स्वतः पीटी उषा यांचे स्वागत केले. यावेळी मान्यवरांनी विविध विषयांवर चर्चा केली.
यावेळी केंद्रीय मंत्री व्ही मुरलीधरन देखील उपस्थित होते.
ट्वीटर द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “पीटी उषा जी यांना भेटून आनंद झाला. “उल्लेखनीय योगदान दिलेल्या पीटी उषा जी प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणा आहेत.क्रीडा क्षेत्रातील त्यांची कामगिरी सर्वश्रुत आहे पण गेल्या अनेक वर्षांपासून नवोदित खेळाडूंना मार्गदर्शन करण्याचे त्यांचे कार्य तितकेच कौतुकास्पद आहे असे राज्यसभेवर नामांकन झाल्याबद्दल पीटी उषा यांचे अभिनंदन करताना मोदी म्हणाले होते.
पीटी उषा यांनी बुधवारी राज्यसभा सदस्य म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडूंनी त्यांना राज्यसभा सदस्य म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
व्ही मुरलीधरन
केरळसाठी उत्तम चांगला दिवस. पीटी उषा यांच्यासोबत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. राज्यासाठी अभिमानास्पद कन्येच्या योगदानाचा गौरव केल्याबद्दल आणि त्यांना राज्यसभेचे सदस्य म्हणून मनोनित केल्याबद्दल केरळच्या जनतेच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली.