Wednesday, July 2, 2025

भिवंडीत इमारत कोसळून सात जण जखमी

भिवंडीत इमारत कोसळून सात जण जखमी

ठाणे : भिवंडीमधील पांजरा पोळ भागातील एका जुन्या कारखान्याचे बांधकाम कोसळून सात जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. सहा जखमींवर इंदिरा गांधी मेमोरीयल रुग्णालयात उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आले. मात्र त्यातील एकाची प्रकृती गंभीर असून भिवंडीमधील खासगी रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल केले आहे.


या कारखान्याची इमारत आज सकाळी सातच्या सुमारास कोसळली. इमारत जुनी झाल्यामुळे रिकामी करण्यात आली होती. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या इमारतीत अडकलेल्या व्यक्तीची सुटका केली.

Comments
Add Comment