नवी दिल्ली (प्रतिनिधी) : उद्धव ठाकरेंनाही भाजपसोबत युती हवी होती. त्यांनी तसे आम्हाला बैठकीत बोलून दाखवले होते. मी माझ्यापरीने युतीसाठी प्रयत्न केले आहेत. आता तुम्ही तुमच्या परीने प्रयत्न करा, असे आम्हाला उद्धव ठाकरे म्हणाले. त्यामुळेच आम्ही आज हा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे स्वत: भाजपसोबत युतीसाठी आग्रही होते. पण खासदार संजय राऊत यांनी खोडा घातला, असा घणाघाती आरोप खासदार राहुल शेवाळे यांनी केला आहे. खासदार राहुल शेवाळे यांनी यावेळी मोठे गौप्यस्फोट केले.
एकनाथ शिंदेंनी वेगळी भूमिका घेतल्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसेना खासदारांना युतीसाठी ग्रीन सिग्नल दिल्याचा गौप्यस्फोट शिंदे गटाचे गटनेते राहुल शेवाळे यांनी केला आहे. मला पण युती करायची आहे, मी माझ्या परीने खूप प्रयत्न केला. आता तुम्ही प्रयत्न करा, असे उद्धव ठाकरे म्हणाल्याचे शेवाळे यांनी सांगितले.
खा. शेवाळे म्हणाले, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे हे भाजपसोबत युती करण्यासाठी आग्रही होते. एकनाथ शिंदेच्या बंडानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसेना खासदारांसोबत मातोश्रीवर बैठक झाली. त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, मला पण युती करायची आहे, मी माझ्या परीने खूप प्रयत्न केला. आता तुम्ही तुमच्या पातळीवर योग्य ते निर्णय घ्या.
जून २०२१ मध्ये उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींसोबत एक तास चर्चा झाली. मात्र त्यानंतर जुलैच्या अधिवेशनात १२ आमदारांचे निलंबन केले, त्यातून चुकीचा संदेश गेला, एकीकडे उद्धव ठाकरे हे युतीचे बोलणे करत आहेत, दुसरीकडे निलंबन करतायत यामुळे भाजप पक्ष श्रेष्ठी नाराज झाले आणि पुढची चर्चा रखडल्याचे ते म्हणाले.
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…
मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…
ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…