Tuesday, April 29, 2025

महत्वाची बातमीरत्नागिरी

कराड-चिपळूण मार्गावरील कुंभार्ली घाट झाला मोकळा

कराड-चिपळूण मार्गावरील कुंभार्ली घाट झाला मोकळा

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका कुंभार्ली घाटाला देखील बसला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळं कुंभार्ली घाटानजीक सोनपात्र वळण येथे दरड कोसळण्याची घटना घडली आहे. दरड हटविण्यासाठी त्या ठिकाणी जेसीबी रवाना करण्यात आले होते दरम्यान, या मार्गावर जड वाहनांची वाहतूक बंद झाली होती मात्र आता मार्ग मोकळा झाला आहे.

कोकण-पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा महत्वाचा असलेल्या कुंभार्ली घाटात दरड कोसळल्याने वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आली होती. वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे. दरम्यान रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

खेड तालुक्यामधील रघुवीर घाटातही दरड कोसळली आहे. सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या या घाटात अवघड आणि अरुंद वळणे आहेत. त्यामुळे हा रस्ता मुळातच काहीसा असुरक्षित आहे. दरवर्षी या घाटात पावसाळ्यात दरड कोसळते. यावर्षीही आज दरड कोसळली असून ती दूर करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने यंत्रणा रवाना केली आहे. जिल्हा माहिती कार्यालयाने याबाबतची माहिती दिली आहे.

Comments
Add Comment