Monday, August 25, 2025

राज्यात २२७९ नवीन कोरोना बाधित रुग्णांचे निदान, एकूण १४७८९ ॲक्टिव्ह रुग्ण

राज्यात २२७९ नवीन कोरोना बाधित रुग्णांचे निदान, एकूण १४७८९ ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई (हिं.स.) : राज्यात आज २२७९ नवीन कोरोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. तर ६ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आज रोजी एकूण १४७८९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

आज २६४६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ७८,५९,९६० कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.९७% एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८४% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,२६,९८,१४० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८०,२२,७८१ (०९.७० टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

Comments
Add Comment