Thursday, April 24, 2025
Homeदेशआज राष्ट्रपतीपदासाठी मतदान, मुर्मू बाजी मारणार?

आज राष्ट्रपतीपदासाठी मतदान, मुर्मू बाजी मारणार?

नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदासाठीच्या मतदानाला सुरुवात झाली असून निकाल २१ जुलै रोजी लागणार आहे. त्यानंतर २५ जुलै रोजा नव्या राष्ट्रपतींचा शपथविधी होईल.

संसदेत मतदानाच्या प्रक्रियेसाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. संसद भवनातील खोली क्रमांक ६३ मध्ये मतदानासाठी ५ बूथ उभारण्यात आले आहेत. यामध्ये एक बूथ दिव्यांग वोटरसाठी असेल. वेगवेगळ्या राज्यांचे नऊ आमदार संसद भवनामध्ये मतदान करतील, यामध्ये उत्तर प्रदेशमधील ४, त्रिपुरामधील २, आसाममधील एक, ओडिशामधील एक आणि हरयाणातील एका आमदाराचा समावेश आहे. तर ४२ खासदार विधानसभेत मतदान करतील.

राष्ट्रपतीपदासाठी एनडीएकडून द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी देण्यात आली आहे. द्रौपदी मुर्मू या ओदिशातील आदिवासी नेत्या आहेत. महिला, दलित, मुस्लीम आणि दक्षिण भारतातील व्यक्ती राष्ट्रपतीपदी विराजमान झाले आहेत. पण आदिवासी समाज यापासून वंचित राहिला होता. त्यामुळे द्रौपदी मुर्मू यांचा विजय होणार असून त्या राष्ट्रपतीपदी विराजमान होणाऱ्या पहिल्या आदिवासी महिला ठरतील.

तर दुसरीकडे यशवंत सिन्हा यांनी २४ वर्षे प्रशासकीय अधिकारी म्हणून काम केले. या काळात त्यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषवली. यादरम्यान त्यांनी बिहार सरकारच्या वित्त मंत्रालयात सचिव आणि उपसचिव म्हणून दोन वर्षे काम केले. यानंतर त्यांची भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयात उपसचिव पदावर नियुक्ती झाली. १९७१ ते १९७४ या काळात त्यांची जर्मनीतील भारतीय दूतावासाचे प्रथम सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -