Saturday, March 22, 2025
Homeताज्या घडामोडीएसटी बस अपघातातील मृताच्या नातेवाईकांना १० लाख रुपये मदत जाहीर

एसटी बस अपघातातील मृताच्या नातेवाईकांना १० लाख रुपये मदत जाहीर

मुंबई : मध्ये प्रदेशमध्ये महाराष्ट्राच्या एसटी बसला झालेल्या भीषण अपघातात आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातातील प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना दहा लाख रुपये मदत देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. यानंतर त्यांनी अपघातात मरण पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे प्रत्येकी दहा लाख रुपये देण्याची कार्यवाही लगेच करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी महामंडळाला दिले आहेत.

१३ मृतांपैकी ७ जणांची ओळख पटली आहे. यापैकी चार जण हे महाराष्ट्रातील अकोला आणि अमळनेरचे आहेत. अद्याप काही प्रवासी बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. तसेच १५ जण वाचले आहेत. यापैकी ५-७ जण गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

एसटी प्रशासन, जिल्हा प्रशासनाने हेल्पलाईन नंबर जारी केले आहेत. हेल्पलाईन क्रमांक घटनास्थळ मदतीसाठी 09555899091 तर जळगाव जि. का. नियंत्रण कक्ष 02572223180, 02572217193 असे हे क्रमांक आहेत.

ओळख पटलेल्या मृतांची नावे…

१. चेतन राम गोपाल जांगिड़ रा. नांगल कला, गोविंदगढ़, जयपुर राजस्थान
२. जगन्नाथ हेमराज जोशी (७०) रा. मल्हारगढ़, उदयपुर राजस्थान
३. प्रकाश श्रवण चौधरी (४०) रा. शारदा कॉलनी, अमळनेर
४. निंबाजी आनंदा पाटील (६०) रा. पिलोदा अमळनेर
५. चंद्रकांत एकनाथ पाटील (४५) रा. अमळनेर
६. अरवा मुर्तजा बोरा (३७) रा. मूर्तिजापुर, अकोला
७. सैफुद्दीन अब्बास रा. नूरानी नगर, इंदूर

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -