Wednesday, April 30, 2025

महाराष्ट्रमहत्वाची बातमी

फडणवीसांच्या वाढदिनी बॅनरबाजी, जाहिराती नको

फडणवीसांच्या वाढदिनी बॅनरबाजी, जाहिराती नको

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशी कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी आणि जाहिरातबाजीवर खर्च करू नये, त्याऐवजी सामाजिक, विधायक उपक्रमातून योगदान द्यावे, असे आवाहन महाराष्ट्र भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्यातील कार्यकर्त्यांना करण्यात आले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी ५ वर्षे उत्तम कार्यभार सांभाळला. तर, गेल्या महिन्यापर्यंत त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून संपर्ण राज्य हलवले. सध्या ते उपमुख्यमंत्री आहेत. राज्यातील सत्तांतर घडवून महाविकास आघाडीची सत्ता घालविण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे, गावखेड्यातील कार्यकर्त्यांपासून ते वरिष्ठ नेत्यांपर्यंत त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल ट्विट करत, भाजपच्या लक्षावधी कार्यकर्त्यांसाठी ते एक प्रेरणा आहेत, असे म्हटले होते. त्यामुळे, फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांकडून मोठी बॅनरबाजी आणि जाहिरातबाजी करण्यात येते. देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस २२ जुलै रोजी असतो. मात्र, आता भाजपकडून कार्यकर्त्यांना बॅनरबाजी आणि जाहिरातबाजीवर खर्च करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

https://twitter.com/BJP4Maharashtra/status/1548929311431806976

फडणवीस यांच्या वाढदिनी वर्तमानपत्रातून जाहिराती, बॅनरबाजी किंवा टीव्ही माध्यमातूनही जाहिरातबाजी न करण्याचे आवाहन भाजपतर्फे करण्यात आले आहे. भाजपचे कार्यालय सचिव मुकूंद कुलकर्णी यांनी यासंदर्भातील पत्रकच जारी केले आहे. तर, भाजप नेते आणि पदाधिकारी यांनी या खर्चाला फाटा देत सेवाकार्यात योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Comments
Add Comment