Tuesday, October 8, 2024
Homeमहत्वाची बातमीशिंदे गटाकडून शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर

शिंदे गटाकडून शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर

शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का

शिंदेंकडून जूनी शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त

शिवसेना मुख्य नेते म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दीपक केसरकर प्रवक्ते तर रामदास कदम, आनंदराव अडसूळ यांची नेतेपदी निवड

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे स्वत: एकनाथ शिंदेंनीच शिवसेनेची जुनी राष्ट्रीय कार्यकारणी बरखास्त केली आहे. यावेळी शिंदे गटाकडून शिवसेना मुख्य नेते म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निवडही करण्यात आली आहे.

आमदार दीपक केसरकर यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आली असून नेतेपदी रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची निवड केली आहे. याशिवाय उपनेतेपदी यशवंत जाधव, गुलाबराव पाटील, उदय सामंत, शरद पोंक्षे, तानाजी सावंत, विजय नहाटा, शिवाजीराव आढळराव पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे.

अद्याप तरी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुखपदाला हात लावलेले नाही. मात्र आमदारांचा विषय न्यायप्रविष्ठ असतानाही एकनाथ शिंदेंनी नवी राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर केल्यामुळे ठाकरे गटाकडून टीका केली जात आहे.

दरम्यान शिंदे आणि फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेला मोठी गळती लागली आहे. आता तर खासदार सुद्धा शिंदे गटाच्या गळाला लागले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांची बैठक सुरू असताना शिवसेनेचे १४ खासदार हे ऑनलाईन बैठकीला हजर असल्याचे समोर आले आहे.

राष्ट्रपती निवडणुकीसाठी शिंदे गटाच्या आमदारांची मुंबईतील ट्रायडेंट हॉटेलमध्ये बैठक सुरू आहे. या बैठकीमध्ये शिवसेनेचे १९ पैकी १४ खासदार उपस्थितीत असल्याचा मोठा धक्का शिवसेनेला बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे खासदार हे शिंदे गटात सामील होणार अशी चर्चा रंगली होती. आज या चर्चेवर शिक्कामोर्तब झाले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -