Tuesday, July 23, 2024
Homeक्रीडापहिल्याच दिवशी चार सुवर्णांसह भारताला बारा पदकांची कमाई

पहिल्याच दिवशी चार सुवर्णांसह भारताला बारा पदकांची कमाई

पोलीस इन्स्पेक्टर सुभाष पुजारी ठरले मास्टर्स आशिया श्री

माफुशी (वृत्तसंस्था) : मालदीवच्या माफुशी बेटावर सुरू असलेल्या ५४व्या आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेच्या आयोजनाच्या पहिल्या दिवशी भारतीय खेळाडू आणि पाऊस दोघेही बरसले. त्यात भारताच्या खेळाडूंनी चार सुवर्ण पदकांची जबरदस्त कमाई केल्यामुळे मालदीवमध्ये अर्ध्या अर्ध्या तासाच्या फरकाने ‘जन गण मन’चे सूर घुमले.

नवी मुंबईच्या पोलीस दलात सहाय्यक पोलीस इन्स्पेक्टर सुभाष पुजारी यांनी अभिमानास्पद कामगिरी करताना मास्टर्स शरीरसौष्ठवाच्या गटात आशिया श्रीचा बहुमान पटकावून इतिहास रचला. तसेच दिव्यांगाच्या गटात के. सुरेश, ज्युनियर गटात (७५ किलो) सुरेश बालाकुमार, स्पोर्टस् फिजीक प्रकारात अथुल कृष्णा यांनी सोनेरी यश संपादले.

मालदीवमध्ये सुरू झालेल्या आशियाई शरीरसौष्ठव अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेत सर्वात मोठा आणि बलाढ्य संघ भारताचाच असल्यामुळे माफुशी बेटावर भारतीय खेळाडूंचे वादळ घोंघावणार हे स्पष्ट होते. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी झालेही तसेच. माफुशी बेटावर वादळी वाऱ्याचे आगमन झाल्यामुळे आयोजकांची चांगलीच तारांबळ उडाली.

मात्र मालदीव शरीरसौष्ठव संघटनेने तासाभरात नव्या आयोजन स्थळाची व्यवस्था केली. ज्यात अकरा गटाच्या स्पर्धा खेळविल्या गेल्या. वादळी वाऱ्यासह सुरू झालेल्या या स्पर्धेच्या प्रारंभापासून भारतीय खेळाडूंनीही वादळी कामगिरीचा धडाका दिला. दिव्यांगाच्या पहिल्याच गटात सोनंच नव्हे तर रौप्य आणि कांस्यपदकही भारतीयांनी जिंकले. के. सुरेशने सुवर्ण विजेती कामगिरी करत भारताचे सुवर्ण पदकाचे खाते उघडले.

५४व्या आशियाई शरीरसौष्ठव अजिंक्यपद स्पर्धेचा निकाल

दिव्यांग शरीरसौष्ठव : १. के. सुरेश (भारत), २. लोकेश कुमार (भारत), ३. मुकेश मीना (भारत).

पुरूष फिटनेस फिजीक (१७० सेमी) : १. वानचाइ कंजानापायमाइन (थायलंड), २. त्रानहोआंगडुय थुआन (व्हिएतनाम), ३ राजू राय (भारत), ४. आरंभम मंगल (भारत).

पुरूष फिटनेस फिजीक (१७० सेमीवरील) : १. दमरोंगसाक सोयसरी (थायलंड), २. नत्तावत फोचत (थायलंड), ३. तेनझिंग चोपल भुतिया (भारत), ४. मोर्तझा बेफिक्र (इराण), ५. कार्तिक राजा (भारत).

ज्यु. पुरूष शरीरसौष्ठव (७५ किलो) : १. के तुएन (व्हिएतनाम), २. मंजू कृष्णन (भारत), ३. मुस्तफा अलसईदी (इराक), ४. कुमंथेम सुशीलकुमार सिंग (भारत), ५. ताकेरू कावामुरा (जपान).

ज्यु. पुरूष शरीरसौष्ठव (७५ किलोवरील) : १. सुरेश बालाकुमार (भारत), २. उमर शहझाद (पाकिस्तान), ३. चिंगखेईनगानबा अथोकपम (भारत).

पुरूष स्पोर्टस् फिजीक (१७० सेमी) : १. अझनीन राशद (मालदीव), २. युवराज जाधव (भारत), ३. अरसलान बेग (पाकिस्तान), ४. आरंभम मंगल (भारत), ५. मुदस्सर खान (पाकिस्तान).

पुरूष स्पोर्टस् फिजीक (१७५ सेमी) : १. अथुल कृष्णा (भारत), २. महदी खोसरवी (इराण), ३. थेपहोर्न फुआंगथापथिम (थायलंड), ४. सचिन चौहान (भारत), ५. अली सलीम इब्राहिम (मालदीव).

पुरूष स्पोर्टस् फिजीक (१८० सेमी) : १. बायत येर्कयेबुलान (मंगोलिया), २. प्रकासित कृआबत (थायलंड), ३. मोहसेन मोन्सेफ नवेखी (इराण), ४. स्वराज सिंग (भारत), ५. शिनु चोव्वा (भारत).

पुरूष स्पोर्टस् फिजीक (१८० सेमीवरील) : १. अलीरेझा अलावीनेझाद (इराण), २. अंबरीश के.जी. (भारत), ३. मोहम्मद इमराह (मालदीव).

मास्टर्स पुरूष शरीरसौष्ठव (४० ते ४९ वय- ८० किलो) : १. सुभाष पुजारी (भारत), २. मालवर्न अब्दुल्ला (मलेशिया), ३. एनगुएन वॅन क्युआंग (व्हिएतनाम), ४. जिराफन पोंगकम (थायलंड), ५. जगत कुमार (भारत).

मास्टर्स पुरूष शरीरसौष्ठव (४० ते ४९ वय – ८० किलोवरील) : १. शहझाद अहमद कुरेशी (पाकिस्तान), २. उमरझाकोव्ह कुरेशी (पाकिस्तान), ३. ए. पुरूषोत्तमन (भारत), ४. फदी जड्डोआ (इराण), ५. नरेश नागदेव (भारत).

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -