Sunday, June 22, 2025

अमेरिकेत मॉलमधील गोळीबारात हल्लेखोरासह चौघांचा मृत्यू

अमेरिकेत मॉलमधील गोळीबारात हल्लेखोरासह चौघांचा मृत्यू

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या इंडियानामधील मॉलमध्ये झालेल्या गोळीबारात हल्लेखोरासह चौघांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी इंडियाना मॉलमध्ये एका फूड कोर्टमध्ये गोळीबार करण्यात आला. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका संशयित बंदूकधाऱ्याचा ही समावेश आहे. हल्लेखोराकडे एक मोठी रायफल होती. या हल्ल्यामागील नेमकी माहिती समोर आली नसून पोलीस अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.


ग्रीनवूड पोलीस विभागाचे प्रमुख जिम इसन यांनी सांगितले की, एकूण चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण यामध्ये जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ते पुढे म्हणाले की, एक व्यक्ती रायफल आणि गोळ्या घेऊन ग्रीनवूड पार्क मॉलमध्ये घुसला. या हल्लेखोऱ्याने फूड कोर्टमध्ये गोळीबार सुरू केला. दरम्यान एका नागरिकाने त्या बंदूकधाऱ्याची हत्या केली. अधिकार्यांनी इतर पीडितांसाठी संपूर्ण मॉलमध्ये शोध मोहीम राबवली, मात्र गोळीबार फक्त फूड कोर्टमध्ये झाल्याची माहिती त्यांनी दिली.


महापौर मार्क मायर्स यांनी ट्विट करून सांगितले की, मृतांमध्ये संशयित बंदूकधाऱ्याचा समावेश आहे. या गोळीबारादरम्यान हल्लेखोराला गोळी लागली. ही शोकांतिका आपल्या समुदायाला खूप दुखावली आहे. कृपया पीडित आणि मृतांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना करा.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा